बुलढाणा(Buldhana):- बुलढाणा तालुक्यातील मासरुळ शेत शिवारात रहाणारे शेतकरी गेल्या आठवड्या यज्ञभरापासून घरेलू माश्याने त्रस्त झाले आहे. याबाबत आरोग्य खात्या यज्ञचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
सूचना देऊन सुद्धा त्यांनी साधी पाहणी सुद्धा केली नाही
आरोग्य उपकेंद्राचे डॉ. सरकटे यांना सूचना देऊन सुद्धा त्यांनी साधी पाहणी सुद्धा केली नाही. एवढे सुस्त झालेले सरकटे यांच्यावर कारवाई का होऊ नये. असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे तसही त्यांचे कार्य निष्क्रिय आहे. या शेत शिवारात (edge of the farm) राहणारे शेतकरी दिलीप बोडखे, संजय बोडखे, सुभाष शिंदे, सागर मिरकुटे घोंगडे, व त्या परिसरातील अनेक शेतकरी या घरेलू माशाने हैराण झालेले आहे. या शेतकऱ्यांचे वास्तव्य सुद्धा शेतातच आहे. त्यामुळे महिला पुरुष लहान मुले यांना जगणे कठीण झाले आहे.
घर असून राहणे कठीण झाले
रात्रीच्या वेळी 11 ते पहाटे 4 या वेळात स्वयंपाक करून शेतात दूर एखाद्या झाडाखाली जाऊन घाई घाईत जेवण करावे लागत आहे. घर असून राहणे कठीण झाले आहे. त्यासंदर्भात त्यांनी माशा मरण्याची अगरबत्ती (Agarbatti) औषधी फवारणी (Medicinal spray) केली असता लाखो माशा मरतात परंतु 15 ते 20 मिनिटात पुन्हा लाखो माशांची उत्पत्ती होते. नेमकी उत्पत्ती होते कुठून असा मोठा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांकडे पडला आहे. घर असून घरात राहणे चहापाणी जेवण करणे सुद्धा कठीण झाले.
पाण्याचा ग्लास हातात घेताच दहा-बारा माशा तात्काळ पडतात
पाण्याचा ग्लास हातात घेतला ना घेतला त्यात दहा-बारा माशा तात्काळ पडतात. गाई म्हशी, कोंबड्या, शेळ्या यांच्या अंगावर सुद्धा माशाच माशा त्यांना चारा खाणे सुद्धा कठीण झाले आहे. याबाबत आरोग्य खात्याचे सरकटे यांना माहिती दिली असता त्यांनी साधी पाणी सुद्धा केली नाही व कुठला उपाय सुद्धा सांगितला नाही तरी संबंधित अधिकारी यांनी या शेतकऱ्यांच्या घराची पाहणी करून या माशांचा तात्काळ बंदोबस्त (arrangement) करावा अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे.