परभणी (Farmers suicide Case) : पुर्णा तालूक्यातील नांदगाव [खु] येथील तरुण शेतकरी विजय मंचकराव भालेराव यानीं शेतातील सतत होणारी नापिकी व शेतातील उत्पादनाला अत्यंत कमी बाजार भाव यामुळे घरचा प्रपंच कशा चालवायचा. अशा विवेचंनातुन राहात्या घरात गळफास घेऊन (Farmers suicide Case) आत्महत्या केली, याबाबत पुर्णा पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली गेली आहे.
याबात सविस्तर वृत्त असे की, नांदगाव (खु) येथील विजय भालेराव या ३५ वर्षीय शेतकऱ्यानी सततच्या नापीकी व कर्जाला कंटाळून गळफास घेऊन केली. आत्महत्या केली पूर्णा पोलीस स्टेशन हद्दीतील नांदगाव (खु) येथील एका ३५ वर्षीय शेतकऱ्याने दि १० रोजी त्याचे राहते घरी छताला दोरी बांधून आत्महत्या केली पूर्णा पोलीस स्टेशन येथे अ.मृ दाखल या घटनेतील विजय मंचकराव भालेराव यांनी छताच्या अॕंगलला दोरी बांधून फाशी घेऊन दोन दिवसांपूर्वी (Farmers suicide Case) आत्महत्या केली.
यांचे नातेवाईक कैलास भालेराव यांना फोन आला की, तुमची पुतण्या विजय भालेराव यांच्या घरासमोर वास येत आहे आणि लोक जमले आहेत. अशी माहिती कळवली. तुम्ही या असे सांगितले तेव्हा नांदगाव येथे आलो पुतण्याच्या घरासमोर त्यांनी घराचा दरवाजा मोडून आत मध्ये पाहिले असता विजय मंचक भालेराव यांने घरातील छताचे अँगलला दोरीने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. त्याच्या जवळ जाऊन पाहिले असता त्याने दोन दिवसांपूर्वी फाशी घेतली असावी त्यामुळे त्याच्या बॉडीचा वास येत होता पोलीस यांनी लोकांच्या मदतीने त्यास खाली उतरवून सरकारी दवाखाना परभणी येथे पाठवले.
तेथे डॉक्टरांनी उत्तरीय तपासणी केली व त्यानंतर प्रेत अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिले त्यांचे नातेवाईक त्यांनी माहिती दिली की त्यांच्या आईने सांगितले की माझा मुलगा शेतातील सततचे होणारे नापीकी मुळे तो तणावात राहत होता शेतीमध्ये उत्पन्न होत (Farmers suicide Case) नसल्यामुळे घर कसे चालवायचे या विवंचनेतून त्याने राहते घराचे छताचे अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असे पूर्णा येथे त्यांनी खबर दिली कैलास भालेराव यांच्या खबरीनुसार पूर्णा पोस्टे येथे अ.मृ दाखल व पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास पडलवार पोलीस हवालदार शाम काळे हे करत आहेत .




