देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Farmers Yojana: शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व योजनेची माहिती ग्रामस्तरावर उपलब्ध करुन द्यावी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Farmers Yojana: शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व योजनेची माहिती ग्रामस्तरावर उपलब्ध करुन द्यावी
मराठवाडाहिंगोली

Farmers Yojana: शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व योजनेची माहिती ग्रामस्तरावर उपलब्ध करुन द्यावी

Deshonnati Digital
Last updated: 2024/12/11 at 9:18 PM
By Deshonnati Digital Published December 11, 2024
Share
Farmers Yojana

ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांचे निर्देश

हिंगोली  (Farmers Yojana) :  शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांनी आढावा बैठकीत दिले.  जिल्हा नियोजन समिती सभागृहात (Farmers Yojana) शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्र.जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी ॲड. हेलोंडे-पाटील म्हणाले, मराठवाड्यात मागच्या वर्षी चाऱ्यांची कमतरता होती. त्यामुळे जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता पाहून गायरान जमिनीवर जास्तीत जास्त चारा लागवड करुन तो (Farmers Yojana) शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्यावा. यामुळे जिल्ह्यातील उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांची प्रगती होण्यास मदत होणार आहे.  तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे गहाण असल्यास त्या सोडवून द्याव्यात.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावाचे दरफलक दर्शनी भागात लावावेत. शेतमाल तारण योजनेची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रचार, प्रसिध्दी करावी. वन्य प्राण्यांच्या नुकसानीचा मोबदला देण्यासाठी शिबिरे घेऊन जनजागृती करावी. यासाठी ऑनलाईन भरण्यात येणाऱ्या अर्जासाठी गावातील आपले सरकार सेवा केंद्रावर सहकार्य करावे. तसेच प्रेरणा प्रकल्पांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे तसेच आत्महत्या होऊ नये यासाठीही समुपदेशन करावेत. त्यांच्यावर मोफत उपचार करावेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळत असल्याची खात्री करावी.

तसेच कौशल्य विकास विभागाच्या योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलापर्यंत पोहोचविण्यासाठी योजनेची माहिती ग्रामस्तरावर उपलब्ध करुन द्यावी. प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत मैदान विकसित झाले पाहिजेत. शाळेमध्ये आरोग्य शिबिरे आयोजित करावीत. आदिवासी विकास विभागाच्या योजना, एमआयडीसीच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. (Farmers Yojana) शेतकऱ्यांच्या बांधावर जैविक प्रयोगशाळेची उभारणी करुन शेतीसाठी लागणारी जैविक खते, वस्तू घरच्या घरी तयार करण्याबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करावे. आकाशातून पडणाऱ्या विजांपासून वाचण्यासाठी दामिनी ॲपच्या वापराची माहिती, हवामान विषयक उपक्रमाची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहोचवावी. प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या प्रतिनिधीची मोबाईल क्रमांकासह यादी ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावावी. यासह शासनाच्या इतर (Farmers Yojana) सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामस्तरावर शिबिरे घेऊन जनजागृती करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

याप्रसंगी प्र.जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्याची संक्षिप्त माहिती दिली. तसेच सर्व संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांनीही राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. बैठकीस उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोल, विभागीय वन अधिकारी डॉ. आर. पी. नाळे, पशुसंवर्धन उपायुक्त सखाराम खुणे, जिल्हा उपनिबंधक एस. एल. बोराडे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

You Might Also Like

Aundha Irrigation lake: औंढा लघु पाटबंधारे तलावात बोट चालविण्याचे प्रशिक्षण

Jintur Mahavitaran: परभणीतील जिंतूर शहर दोन दिवसांपासून अंधारात…!

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

Hingoli Panchayat Samiti: हिंगोलीतील पं.स.च्या नविन इमारत लोकापर्णाची लगबग; आ. मुटकुळेंची पाहणी

Parbhani youth suicide: परभणीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…!

TAGGED: Farmers Yojana
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Baba Siddiqui
मुंबईमहाराष्ट्रराजकारण

Baba Siddiqui passes away: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर मुंबईत गोळीबार; रुग्णालयात मृत्यू

Deshonnati Digital Deshonnati Digital October 13, 2024
Udgir: शिवस्वराज्य यात्रा १४ ऑगस्टला उदगीरमध्ये!
National Abacus Competition: राष्ट्रीय प्रोएक्टिव्ह अँबकस स्पर्धेत कु. सान्वी केशेट्टी भारतातुन प्रथम
Risod: महाराष्ट्र दिनी वीर पिता वीर माताचा सत्कार!
Lord Venkatesh Balaji: उद्यापासून श्री व्यंकटेश बालाजी भगवान यांचा ब्रम्हाेत्सव
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Aundha Irrigation lake
मराठवाडाहिंगोली

Aundha Irrigation lake: औंढा लघु पाटबंधारे तलावात बोट चालविण्याचे प्रशिक्षण

May 22, 2025
Jintur Mahavitaran
मराठवाडापरभणी

Jintur Mahavitaran: परभणीतील जिंतूर शहर दोन दिवसांपासून अंधारात…!

May 22, 2025
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

May 22, 2025
मराठवाडाहिंगोली

Hingoli Panchayat Samiti: हिंगोलीतील पं.स.च्या नविन इमारत लोकापर्णाची लगबग; आ. मुटकुळेंची पाहणी

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?