शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांचा उपक्रम!
नांदेड (Farmers) : संकटे नैसर्गिक (Natural Disasters) असो की मानवनिर्मित यांचा सातत्याने सामना करत बिकट परिस्थितीला तोंड देऊन सकारात्मक आशावाद घेत जगाचं पोट भरणाऱ्या 21 शेतकरी/शेतमजूरांना दीपावलीच्या निमित्ताने शिवसेना शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले (Prahlad Ingole) यांनी कपड्यांचा आहेर करून त्यांचा सन्मान केला.
शासनाने केलेल्या तुटपूजा मदतीवर शेतकऱ्यांचे नुकसान भरून येणार नव्हतं!
ज्यांच्या पाचवीलाच दारिद्र्य पूजलेलं आहे अशा बळीराजाला सातत्याने एक ना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. नुकताच परतीच्या पावसाने (Rain) मराठवाड्यात हाहाकार माजवला शेतकऱ्यांच्या हाता- तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. शासनाने (Government) केलेल्या तुटपूजा मदतीवर शेतकऱ्यांचे नुकसान भरून येणार नव्हतं. दिवाळी सारख्या सणाला आर्थिक अडचणी असतानाही कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत अअसतांना घरातील कर्त्या पुरुषाला स्वतःच्या आवडी-निवडी, हौस सगळं काही बाजूला ठेवावं लागतं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आलेल्या संकटाचा मुकाबला करत कुटुंबासह समाजाला धीर देत सक्षमपणे आपल कर्तव्य (अन्न निर्मितीच) बजावणाऱ्या 21 शेतकरी/ शेतमजुरांना कपड्यांचा आहेर करून त्यांचा सन्मान केला. शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले कृषी भूषण भगवान इंगोले यांच्या उपक्रमाच्या सर्वत्र स्वागत होत आहे यावेळी मालेगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष एकनाथ पाटील, माजी पोलीस पाटील भीमराव इंगोले, निवृत्ती कदम, गंगाधर काशीरामजी इंगोले, विश्वनाथ इंगोले, बब्बर पाटील, विठ्ठल बुट्टे, भगवान इंगोले,माधवराव कदम कोंढेकर, वंश इंगोले यांच्यासह मान्य