रिसोड तालुक्यातील शेती कोरडवाहु!
रिसोड (Farmers) : अतिवृष्टीचा फटका बसलेल्या बळीराजाला सावरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने 31 हजार 628 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले.आता पर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत,असे शेतकरी मदत पॅकेजचे वर्णन करण्यात आले. हातातोंडाशी आलेले पीक पुरात वाहून गेल्याने राज्याच्या विविध भागांतील शेतकरी अक्षरक्ष: हवालदिल झाले आहे.परंतु रिसोड प्रशासनाच्या (Administration) वेळकाढू धोरणामुळे व सोयीनुसार केलेल्या सर्वेक्षणाने शेकडो शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसल्याची परीस्थिती निर्माण झाल्याने अनेक शेतकरी शासन देत असलेल्या हक्काच्या मदती पासुन वंचीत राहात आहे.
नुकसानाचे सर्वेक्षण हे दुटप्पी झाल्याचा आरोप!
यंदा पावसाने सर्वत्र हाहाकार केल्याने तालुक्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह (Heavy Rain),ढगफुटी सदृश्य पावसाने शेती खरडली,काही ठिकाणी पाळीव प्राणी दगावले,शेती खरडली तर विहीरी गाळल्या परंतु तालुक्यातील महसुल,कृषी,पंचायत विभागाच्या स्वाक्ष-याने झालेले नुकसानाचे सर्वेक्षण हे दुटप्पी झाल्याचा आरोप होत आहे. याकडे गंभीर प्रकाराकडे सर्वच राजकीय पक्षांना दुर्लक्ष केले आहे.
अतिवृष्टीतील सर्वेक्षणावर प्रश्न चिन्ह निर्माण!
रिसोड तालुक्यात शेतीचे क्षेत्र एकुण 74000 हेक्टर शेत जमीन आहे,त्यापैकी शासनाने केलेल्या पंचनामा मध्ये 40747.02 हे.जिरायती , बागायत 424.70 हे आणि फळबाग 0 नमुद करून अ ब क ड अहवाल सादर केला आहे,त्यामुळे अतिवृष्टीतील सर्वेक्षणात फळबाग शुण्य टक्के नुकसान रिसोड तालुक्यात दाखविल्याने या अतिवृष्टीतील सर्वेक्षणावर प्रश्न चिन्ह निर्माण झाल्याची चर्चा आहे.कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात 4000 हेक्टर पेक्षा जास्त फळबाग लागवडचे क्षेत्रफळ आहे.मग नुकत्याच जाहीर झालेल्या सर्वेक्षणात फळबागाचे नुकसान शुन्य दाखविल्याने या सर्वेक्षणावर प्रशचिन्ह निर्माण झाल्याचे दिसत आहे.महागांव येथिल अनिल मवाळ यांच्या शेतातील 25 जुनच्या अतिवृष्टीत शेती खरडली,रोजगार हमीची विहीर गाळली,स्पींकलर,पाईप,शेतातील माती सह हळद पिक वाहुन गेल्याने त्यांचे अंदाजे सहा लाखा पेक्षा जास्त नुकसान झालेले आसतांनी महसुल, प्रशासनाला मात्र शेतकऱ्याच्या नुकसानाचा विसर पडल्याने नुकत्याच जाहीर झालेल्या मदती मध्ये संबंधित शेतकरी मदती पासुन वंचीत राहत आहे या बाबत रिसोड तहसीलदार यांच्याकडे नुकसानाच्या भरपाई संदर्भात लेखी तक्रार सुद्धा दिली होती. आता पर्यंतची सर्वात मोठी मदत म्हणून महायुती सरकार जाहिरातबाजी केल्याशिवाय राहणार नाही.पण नुसती मदत जाहीर करून आपली जबाबदारी सरकारला ढकलता येणार नाही.अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईल,‘पॅकेज’ हा नुसता आकड्यांचा खेळ न ठरता शेतकरी पुन्हा उभा राहील,याचीही खबरदारी शासनातील वरिष्ठांना घ्यावी लागेल. कारण स्थानिक पातळीवरील लालफितीचा मोठा फटका शेतकऱ्यांना नेहमीच खते खरेदी पासुन,कर्ज पुरवठ्यापर्यंत सगळीकडे बसत असतो.यावेळची ही मदत शेतकरी वर्गासाठी सार्थ ठरावी हीच अपेक्षा


