कुरखेडा(Gadchiroli):- तालुक्यातील मालेवाडा वन परिक्षेत्र (Forest area)अंतर्गत उपदल्ली या गावातील चार शेतकर्यांचे शेतातील धान पर्हे रानटी हत्तींचा(Wild elephants) कळपाने शेतात धुडगुस घालत पुर्ण पणे नासधूस केले आहे. हा प्रकार दि.१५ च्या रात्रो ला घडला असुन काल सकाळी शेतकर्यांच्या निदर्शनास आली. मागील दिड ते दोन वर्षापासून जवळ पास पंधरा ते वीस रानटी हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यात फिरत आहे.शेतकर्यांचे शेतपिकांचे, घराचे नुकसान(Damage to the house) करित आहे.
शेतकरी चिंताग्रस्त झाला असुन रोवणी कशी करायची? हा प्रश्न त्यांना पडला
परवा रात्रो दरम्यान उपदल्ली नजिक जयसिंगटोला परिसरातील जंगलात दिसुन आले होते. त्याच रात्री हत्तींचा कळप उपदल्लीच्या दिशेने मार्गक्रमण करित सखाराम चवरदाने, सुभाष मडावी, राकेश कोचे, मन्साराम मडावी या शेतकर्यांच्या शेतातुन गेल्याने चारही शेतकर्यांचे अंदाजे पंधरा ते वीस एकर शेती ला लागवडी चे धान पर्ह्याचे नुकसान झाले आहे. शेतकरी चिंताग्रस्त (nervous)झाला असुन रोवणी कशी करायची हा प्रश्न त्यांना पडला आहे. दुबार पेरणी करण्याची वेळ नाही, यंदा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हाही विचार मनात भेळसावत आहे. शासनाने त्वरित पंचनामा करुन सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे.