पूर्णा तालुक्यातील खडाळा येथील शेतकर्याची आत्महत्या
ताडकळस (Purna Farmer Suicides:) : शेतातील सततच्या नापीकीला कंटाळुन तननाशक प्राशन केलेल्या शेतकर्याचा उपचारादरम्यान मंगळवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. मयत शेतकरी पूर्णा तालुक्यातील खडाळा येथील रहिवासी आहे.याप्रकरणी ताडकळस पोलीसात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रल्हाद बालाजी लोखंडे वय ४५ वर्ष रा.खडाळा ता.पूर्णा असे मयत शेतकर्याचे नाव आहे. बालाजी लोखंडे यांनी पोलीसात खबर दिली आहे. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा प्रल्हाद लोखंडे हा शेतात गेला होता. सकाळी १० वाजेच्या सुमारास शेत शेजारी पद्माकर शेजारी यांनी खबर देणार्यांना माहिती दिली.
शेताकडे जात असतांना (Purna Farmer Suicides) प्रल्हाद झोपलेला दिसला. त्याच्या जवळ जाऊन विचारणा केली असता, प्रल्हादने शेतातील नापिकीला कंटाळुन तननाषक पिल्याचे सांगितले. त्यानंतर संबधीताला परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास प्रल्हाद लोखंडे यांचा मृत्यू झाला. ताडकळस पोलीसात नोंद करण्यात आली आसून पोलीस अधिक तपास करत आहेत.