शेतकरी सोयाबीन आग

अज्ञात व्यक्तीने चार शेतकरी यांच्या सोयाबीनच्या गंजी पेटविल्या; अंदाजे १४ लाखाचे नुकसान 

Farmers soybean fire: लाळी खु. येथील चार शेतकऱ्यांच्या काढून ठेवलेल्या सोयाबीन च्या गंजी अज्ञात व्यक्तीने दि १२ रोजी साडेअकरा ते बारा वाजेदरम्यान रात्री पेटवून दिल्याने अंदाजे 14 लाखांची नुकसान

अज्ञात व्यक्तीने चार शेतकरी यांच्या सोयाबीनच्या गंजी पेटविल्या; अंदाजे १४ लाखाचे नुकसान 

Farmers soybean fire

वाढवणा बु (Farmers soybean fire) : जळकोट तालुक्यातील लाळी खु. येथील चार शेतकऱ्यांच्या काढून ठेवलेल्या सोयाबीन च्या गंजी अज्ञात व्यक्तीने दि १२ रोजी साडेअकरा ते बारा वाजेदरम्यान रात्री पेटवून दिल्याने अंदाजे 14 लाखांची नुकसान घराण्याची घटना घडल्याने शेतकऱ्यात घबराहाट निर्माण झाली आहे. अधीच दुष्काळाच्या झळा अन उपलब्ध पाण्यावर सिंचन करून मोठ्या मेहनतीने पिके जगवले. सोयाबीन काढणी करून गंजी स्पून ठेवल्या दि १२ रोजी रात्री अज्ञात चोरट्याने लाळी खु येथील चार शेतकऱ्यांच्या गंजी पेटवून दिल्या.

मनोहर गंगाराम बुर्से यांच्या १८ एकरातील अंदाजे ७५ क्विटलची सोयाबीनची गंजी. शेषेराव गंगाराम बुर्से यांच्या १८ एकरातील अंदाजे ७५ क्विंटल. भाऊसाहेब तुकाराम बुर्से साडेसात एकरातील अंदाजे ५० क्विंटल सोयाबीन गंजी. विष्णूकांत नरसिंग मादलापूरे यांच्या अंदाजे १० क्विंटल सोयाबीनची गंजी अज्ञाताने पेटवून दिली. यात चारही शेतकऱ्याचे १४ लाखाचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच शेतकरी व गावकरी यांनी घटनास्थळी धाव घेतली पण चारही गंजी जळून खाक झाल्या होत्या.

एक गंजी वाचवण्यात गावकऱ्याना यश आले पण त्यातील ही (Farmers soybean fire) गंजीचा काही भाग जळाला. घटनास्थळी जळकोटचे पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड यांनी पाहणी करून पंचनामा केला. महसुल विभागाकडून तलाठी आकाश पवार यांनी पंचनामा केला. घटनेची फिर्याद जळकोट पोलिसात दाखल करण्यात आली असून अरोपीचा शोध घ्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली व सदरील शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

टैग्स: Farmers soybean fire