४० वर्षांपासून वास्तव्य; महिला-पुरुषांचा सहभाग
वाशिम (Fasting to death) : तब्बल ४० वर्षांपासून वास्तव्य करीत असलेली जागा नियमानुकुल करून देण्यात यावी, या मागणीसाठी तालुक्यातील कार्ली येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास (Fasting to death) सुरुवात केली आहे.
कार्ली येथील शासकीय जमिनीवरील वार्ड क्र. १ व २ मध्ये उपोषणकर्ते गत चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळापासून वास्तव्य करीत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, याच ठिकाणी सदर रहिवाशांना रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदार कार्ड व इतर अन्य सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. मात्र, केवळ नमुना ८-अ नसल्याच्या कारणाने तब्बल ३०० लोकांवर बेघर होण्याचा प्रसंग ओढवत आहे. त्यामुळे वार्ड क्रमांक १ व २ मधील उपोषनार्थी राहत असलेली जागा नियमानुकुल करून नमुना ८-अ देण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे.
जागा नियमानुकुल करून नमुना ८-अ मिळावा, याकरिता सुमारे ३० ते ३५ रहिवासी जानेवारी २०२४ पासून पाठपुरावा करीत आहेत. ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदसह जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठेही त्यांनी झिजविले आहेत. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी बेमुदत आंदोलनाचे अस्त्र उपसले असून, १२ ऑगस्टपासून ३० ते ३५ महिला-पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Fasting to death) आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.