परभणी/पाथरी (Ramgiri Maharaj) : मुस्लिम समाजाचे धर्मगुरू प्रेषित महंमद पैगंबर यांच्या बाबत अपशब्द काढल्याने आमच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे म्हणत रामगिरी महाराजांवर (Ramgiri Maharaj) कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी पाथरीत तीन युवक आमरण उपोषणाला बसले आहेत.
रामगिरी महाराजांच्या (Ramgiri Maharaj) वक्तव्याने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले असून यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, शांतता टिकविण्यासाठी रामगिरी महाराजांना अटक करावी अशी मागणी करत शहरातील सय्यद आरेफ एजाज कादरी, शेख आवेज शेख युसूफ व सय्यद अकबर मुख्तार कादरी हे तीन युवक शुक्रवार ३० ऑगस्ट पासून तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. दरम्यान उपोषणाच्या आजच्या पहिल्या दिवशी उपोषणार्थीं च्या समर्थनार्थ शेकडो मुस्लिम समाजातील नागरिक उपोषणस्थळी जमा झाले होते यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ वळवण्यात आली होती.