Wani crime :- शहरात भाईगिरीचा जोर दिवसेंदिवस वाढत असून सोमवारी रात्री उशिरा आणखी एक धक्कादायक घटना घडली. पोलीस स्टेशनपासून (Police station) अवघ्या हाकेच्या अंतरावर तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सहा जण अटकेत; दोन फरार
२९ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वा. च्या सुमारास सेवानगर येथील अंकुश मोगरे या युवकावर तब्बल आठ जणांनी काठ्या व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भोलेश्वर नारायण ताराचंद (४०), रा. सेवानगर, वणी यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी विलास चौहाण, विशाल चौहाण, सूर्यभान चौहाण, विरसिंग उर्फ विरु लिवारे, दुर्गेश उर्फ सोनू चौहाण, अथर्व उईके, दोन अनोळखी व्यक्ती सदर आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. यापैकी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत.




