मंगरूळपीर(Washim):- दारू का पितोस असे मुलास विचारले असता, दोन दारुड्या मुलांनी पित्याला मारहाण व शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना तालुक्यातील कोठारी येथे १९ मे रोजी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी २० मे रोजी दोन्ही आरोपी मुलांवर गुन्हा दाखल (Filed a case) केला आहे.
शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार फिर्यादी निराकार भाऊराव सातपुते वय ५५ रा.कोठारी यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की , फिर्यादीच्या मुलांना दारूचे व्यसन(Addiction to alcohol) आहे. अशातच १९ मे रोजी रात्री नऊच्या सुमारास फिर्यादीचा मोठा मुलगा निलेश सातपुते हा दारू पिऊन आला. त्यामुळे फिर्यादीने त्याला तू दारू का पितो असे म्हटले असता ,आरोपी मुलाने तू कोण म्हणणारा, असे म्हणत वाद करून घरासमोरील रस्त्यावर कॉलर पकडून खाली पाडत आणि फिर्यादी पित्याला ब्लेडसारख्या धारदार शस्त्राने(Sharp weapons) दोन्ही हाताच्या दंडावर, छातीवर तसेच मानेवर मारून जखमी केले. त्यावेळी फिर्यादीचा लहान मुलगा विशाल सातपुते हा तेथे आला व त्यानेही वडिलांशी वाद घालून लोटपाट करीत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशा तक्रारीवरून मंगरूळपीर पोलीसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.