परभणी/ जिंतूर (Parbhani):- शहरातील बामणी प्लॉट भागात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून लिंग पिसाट सासऱ्याने घरात कोणी नसल्याची संधी साधून स्वतःच्या 35 वर्षीय सुनेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार (sexual abuse) केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पीडित सुनेच्या फिर्यादीवरून रविवार 19 मे रोजी पोलिसात सासऱ्याविरुद्ध बलात्काराचा (rape) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घर खर्च चालावे म्हणून मुलास पिठाची गिरणी टाकून दिली
सदरील घृणास्पद घटनेबाबत अधिक वृत्त असे की, शहरातील बामणी प्लॉट भागात राहणारे माजी नगरसेवक तथा भाजपा(BJP) अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र(Maharashtra) प्रदेश विभागीय प्रमुख आहेत यांचा मुलगा दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाला होता. परिणामी ते कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी कोणतेही काम करत नव्हता, म्हणून सुनेने ही खंत आपल्या सासऱ्याकडे सांगितली म्हणून त्यांनी घर खर्च चालावे म्हणून मुलास पिठाची गिरणी टाकून दिली. पण या मोबदल्यात नेहमी सुनेवर वाईट नजर ठेवत 05 मार्च रोजी 02 वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नसल्याची संधी साधत सदरील लिंग पिसाट सासऱ्याने स्वतःच्या 35 वर्षीय सुनेचा हात धरून सुनेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने सुनेवर लैंगिक अत्याचार करून माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडवून आणली. आणि त्यानंतर प्रकारा विषयी कोणाला सांगू नये म्हणून धमकावले. शेवटी पीडित सुनेने हिम्मत एकवटून रविवार 19 मे रोजी जिंतूर पोलीस ठाणे गाठून सासरे यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोउपनि बुद्धेवार हे करत आहे.