भूम (Wedding Helicopter) : आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलीला मिळाले असे सासू-सासरे ज्याची चर्चा सध्या धाराशिव जिल्ह्यात होत आहे. भूम तालुक्यातील अंतरवली गावात नुकताच एक अनोखां लक्षवेधी विवाह सोहळा पार पडला. येथील शेतकरी भास्कर शिकेतोड यांनी आपल्या मुलाच्या लग्नात शाही थाटाचा अनुभव देत (Wedding Helicopter) नवरीसाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवले.
या (Wedding Helicopter) विवाह सोहळ्याची सध्या संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे नवरी सर्वसामान्य कुटुंबातील असूनही शिकेतोड यांनी आपल्या मुलाचा विवाह अत्यंत थाटात साजरा केला. हेलीकॅप्टर द्वारे नवरीला आणल्याने उपस्थित पाहुणे आणि गावकरी थक्क झाले. अक्षरश: हा क्षण नातेवाईकांनी गावकऱ्यांनी मोबाईल मध्ये कैद केला. सोशल मीडियावरही या (Wedding Helicopter) विवाह सोहळ्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कुटुंबाने केलेली ही विशेष सजावट व्यवस्था आणि शाही पद्धतीने पार पडलेला सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला. (Wedding Helicopter) विवाहाच्या निमित्ताने अंतरवाली गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.