परभणी(Accident):- गंगाजी बापू येथे जावळाच्या कार्यक्रमाला जात असताना झालेल्या अपघातात जिंतूर तालुक्यातील कोक येथील बाप – लेकाचा मृत्यू झाला. तर गाडीतील इतर दहा ते बारा नातेवाईक जखमी झाले. ही घटना ताडकळस – पूर्णा रस्त्यावर गुरुवार ६ जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
परभणीच्या कोक येथील बाप – लेकाचा अपघातात मृत्यू
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील श्रीक्षेत्र गंगाजी बापू येथे जावळ काढण्यासाठी एम.एच. ०४ एच.डी. ९१६३ या वाहनाने जिंतूर तालुक्यातील कोक, शेक, साडेगाव येथील नातेवाईक जात होते. शेक येथील नृसिंह जिजाभाऊ गलांडे यांच्या सोहम या लहान मुलाचे जावळ काढण्याचा कार्यक्रम होता. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास ताडकळस येथून दोन किमी अंतरावर पूर्णा रस्त्यावर लघुशंकेसाठी बोलेरो(Bolero) वाहनातील नातेवाईक खाली उतरले. याच वेळी ताडकळस कडून नांदेडकडे भाजीपाला घेवून जाणारा एम.एच. २० जी.सी. ०९३४ या पिकअपने रस्त्यावर थांबलेल्या बोलेरोला धडक (strike) दिली. या धडकेत प्रसाद बापूराव गारुडी वय ४५ वर्ष रा. कोक यांचा जागीच मृत्यू झाला तर सुनील प्रसाद गारुडी वय १६ वर्ष हा गंभीर जखमी (wounded) झाला. त्याला उपचारासाठी नांदेड (Nanded)येथे दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातात दहा ते बारा जण जखमी असून त्यांना उपचारासाठी परभणी, नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सपोनि. गजानन काठेवाडे, बीट जमादार कांगणे, पोते, विजय चव्हाण यांनी भेट दिली.
दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात एकाचा मृत्यू एक जखमी
ताडकळस : दुचाकीवरील नियंत्रण(Control) सुटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू(death) झाला तर एक जण गंभीर जखमी (seriously injured) झाला. ही घटना बुधवार ५ जून रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास सिंगणापुर ते ताडकळस रोडवर लिमला फाटा येथे घडली. अविनाश लक्ष्मण वाघमारे वय ३० वर्ष असे मयताचे नाव आहे. तर नारायण हरीभाऊ सोळंके वय २४ वर्ष हा जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात(Hospital) दाखल करण्यात आले. सपोनि. काठेवाडे, पोहेकॉ. गणेश लोंडे यांनी घटनास्थळी भेट दिली.