देशोन्नती वृतसंकलन
माहूर (Wild boars attack) : आष्टा शिवारातील शेतकरी बाबु रिठे यांचा शेतात काम करीत असलेल्या संगीता मेश्राम पुष्पा कुडमते या महीला शेतमजूरावर रानडुकराने अचानकपणे हल्ला करून शेतमजूर महिलेला गंभीर जखमी केल्याने शेतमजूर महिलेस उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्याची घटना दि.२७ रोजी दुपारी ५ वाजता च्या सुमारास घडली आहे.
आष्टा शिवारातील शेत बाबू रिठे यांनी आष्टा येथिल भागीलदार यांना दिल्याने अजय मेश्राम व त्यांच्या आई संगीता मेश्राम व पुष्पा उत्तम कुडमते तिघे एकमेकांच्या जवळच शेत काम करत अचानक पणे रान डुकराने अजय मेश्राम व त्यांच्या आईला जोरदार धडक देऊन खाली पाडले तर पुष्पा कुडमते त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला या हल्यात पुष्पा बाई या गंभीर जखमी झाल्याने त्यांना माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करीत पुढील उपचारास यवतमाळ येथे हलविले दोघांना आष्टा येथील दवाखान्यात उपचार करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव कर्मचाऱ्यांनी रुग्णालय गाठले.