शेगाव (Dr. Balasaheb Ambedkar) : ईव्हीएम विरोधात वंचीत लढा देणार असुन न्याय मिळेपर्यंत न्यायालयात पुराव्यानिशी उभी राहुन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवुन देणार व येणाऱ्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर कशा पार पडतील हा लढा वंचीत बहुजन आघाडी देणार असल्याचे प्रतिपादन वंचीत बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष क्ष डॉ. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर (Dr. Balasaheb Ambedkar) यांनी केले.
शहरातील हॉटेल विघ्नहर्ता इन येथे १० डिसेंबर रोजी आयोजीत राष्ट्रीय कार्यकारीणीच्या सभेत ते पत्रकारांना संबोधित करताना बोलत होते. अट्रॅड. आंबेडकर (Dr. Balasaheb Ambedkar) पुढे म्हणाले की, आम्ही ईव्हीएमच्या विरोधात आंदोलनाची सुरूवात केली असून चिफ इलेक्टोरल अधिकारी यांना पत्र पाठवून शेवटी ६ वाजल्यानंतर झालेल्या ७६ लाख मतदानासंदर्भात माहिती विचारली आहे. कारण इलेक्शनच्या नियमावलीनुसार ६ नंतर झालेल्या प्रत्येक मतदाराला टोकन द्यावे लागते. त्या अनुषंगाने इलेक्शनच्या दिवशी ६ वाजल्यानंतर इलेक्शन कमिशनकडून टोकन दिलेल्या मतदारांची आकडेवारी बाबतची माहिती मिळणे आवश्यक आहे.
मारकवाडीतील प्रकार हा चुकीचा असून बॅलेटपेपरवरील मतदानाची प्रक्रिया रोखण्याचा कुठलाही अधिकार प्रशासनाला किंवा पोलिसांना नाही. शासनाचे हे कृत्य संशयास्पद असून यावरून ईव्हीएममध्ये काही गडबड झाल्याचा संशय बळावतो. त्यामुळे मारकडवाडीतील इलेक्शन जबरदस्तीने थांबविल्याबाबतचा जबाब काळजीवाहू सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देणे क्रमप्राप्त आहे.
यावेळी राष्ट्रीय कार्यकारणी गठीत करणयात आली यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदी अड. प्रकाश यशवंत आंबेडकर (Dr. Balasaheb Ambedkar) तसेच कार्यकारीणी सदस्यामध्ये डॉ. अरूण सावंत, महेश भारतीय, अरूंधती शिरसाठ, डॉ. नितीन ढेपे, अशोक सोनोने, राहुल गायकवाड, दिशा पिंकी शेख, सविता मुंडे, प्रा. किसन चव्हाण, सुजाता वालदेकर, डॉ. क्रांती सावंत, सैय्यद खतीब नतीकोद्दीन यांची नावे सुचविण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष देवा हिवराळे, शेगांव शहराध्यक्ष मो. सलमान, तालुकाध्यक्ष दादाराव अंभोरे, युवक शहराध्यक्ष संदेश शेगोकार, उदय सुरवाडे, मिलींद शेगोकार, राजेश शेगोकार, प्रभाकर पहूरकर, अजय सुरवाडे, क्षितीज निर्वाण, आकाश बांगर, अमोल शेगोकार, अंबादास सहारे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती यावेळी होती.