परभणी (Parbhani):- मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक ठरणार्या वैद्यकीय (Medical)प्रवेश प्रक्रियेतील ७०:३० कोटा पद्धत रद्द करण्यासाठी आपण सातत्याने अधिवेशनात व बाहेर आवाज उठवला. त्यामुळे हा कोटा रद्द झाला. आता उच्चतंत्र शिक्षण मंत्री(Minister of Education) चंद्रकांत पाटील यांनी मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली. परंतु ती अद्यापही लागू झाली नाही.
परभणीत आ.डॉ.राहुल पाटील यांचे प्रतिपादन
यासाठी १ जुलै रोजी राज्य विधिमंडळात(State legislatures) लक्षवेधी मांडून मुलींच्या मोफत शिक्षणाकडे सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे प्रतिपादन आ.डॉ. राहुल पाटील यांनी दिली. अक्षदा मंगल कार्यालयात गुरुवार २७ जून रोजी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा गुणगौरव सोहळा घेण्यात आला. यावेळी आ.डॉ. पाटील बोलत होते. यावेळी शिक्षण तज्ञ प्रा. रवींद्र बनसोड, आंतरराष्ट्रीय क्रिकेटर (International cricketer) अंकित बावणे, १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट टीम चा कर्णधार सचिन धस, शिक्षणाधिकारी आशा गरुड, संतोष बोबडे, सह संपर्क प्रमुख विवेक नावंदर, महेश पाटील आदींसह शिवसेनेचे(Shiv Sena) पदाधिकारी यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना आ.डॉ.राहुल पाटील म्हणाले, दोन वैद्यकीय महाविद्यालयासह(Medical Colleges) अन्य शैक्षणीक संकुलामुळे परभणी शिक्षणाची पंढरी होत आहे.अजुनही उच्च शिक्षणाची सोय परभणीत झाली पाहीजे यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे असे डॉ.पाटील म्हणाले. सूत्र संचालन गजनान काकडे यांनी केले. यावेळी ६४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनो ध्येय निश्चित करा – प्रा.बनसोड
दहावी आणि बारावी ही विद्यार्थ्यांसाठी यशाची पहिली पायरी आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी या काळात कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. आयुष्यात खरा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला ध्येय निश्चित करावे लागेल. एकदा ध्येय निश्चित झाले म्हणजे खडतर परीश्रम, जिद्द, चिकाटीच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते. – शिक्षण तज्ज्ञ प्रा.रविंद्र बनसोड