देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (Chikhli assembly elections) : चिखली विधानसभा निवडणुकीकरीता अंतिम उमेदवारांची यादी जाहीर झाली असून त्यांना चिन्हवाटप देखील करण्यात आले. यामध्ये (Chikhli assembly elections) चिखली विधानसभेकरीता २४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशिब आजमावणार असून राष्ट्रीय व राज्यस्तरावरील पक्षांचे १० आणि अपक्ष १४ अशा एकूण २४ उमेदवारांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.
गणेश उर्फ बंडू श्रीराम बरबडे-महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन), राहुल सिध्दविनायक बोंद्रे-भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (हात), अॅड. शंकर शेषराव चव्हाण- बहुजन समाज पार्टी (हत्ती),श्वेता विद्याधर महाले- भारतीय जनता पार्टी (कमळ), खालीद अहेमदखान तालीबखाँ – जनता दल (सेक्युलर) (प्रेशर कुकर), मच्छिंद्र शेषराव मघाडे- सोशालिस्ट पार्टी इंडिया (ऊस शेतकरी), रेणुका विनोद गवई – बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी (शिट्टी), विजयकांत सांडू गवई- रिपब्लीकन सेना (शिवणयंत्र), सिध्दांत अशोकराव वानखेडे आझाद समाज पार्टी (कांशिराम) (किटली), सिध्देश्वर भगवान परिहार-वंचित बहुजन आघाडी(गॅस सिलेंडर) या १० राष्ट्रीय व राज्यस्तरावरील पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे.
तसेच अपक्ष उमदेवारांमध्ये अविनाश निंबाजी गवई (ऑटो रिक्षा), नासीर इब्राहिम सैय्यद (कॅमेरा), प्रशांत पुरुषोत्तम ढोरे (पान्हा), राहुल ज. बोंद्रे (पेनाची निब सात किरणांसह), डॉ.मोबीन खान अय्युब खान (एअर कंडिशनर), मोहम्मद रईस उस्मान मोहम्मद इद्रीस (कपाट), रजनी अशोक हिवाळे (बॅटरी टॉर्च), राहुल प्रल्हाद बोर्डे (पेटी), विजय मारोती पवार (भाला फेक), शरद डिगांबर चेके-पाटील (काडेपेटी), शेख मुनव्वर शेख इब्राहिम (हिरवी मिरची), शेख सईद शे.मुस्ताक (सफरचंद), सतीश जीवन पंडागळे (बॅट) आणि संतोष रमेश उबाळे (ट्रम्पेट) या १४ उमेदवारांचा समावेश आहे.
निवडणुकीच्या (Chikhli assembly elections) रिंगणात असलेल्या २४ उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात झाली असून, येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र पोळ, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार संतोष काकडे, सहायक निवडणूक अधिकारी गोपाळ कडू यांनी प्रसिद्धीस दिली आहे.