-आतापर्यंत १० फेर्या राबवूनही प्रवेश अपुर्ण
गडचिरोली (11th admission) : शैक्षणिक सत्र २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यामध्ये इयत्ता ११ वी चे प्रवेश केंद्रिय ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहेत. इयत्ता ११ वी ऑनलाईन (11th admission) प्रवेश प्रक्रियेच्या आत्तापर्यंत १० फेर्या राबविण्यात आलेल्या आहेत. मात्र प्रवेश अपुर्ण असल्याने शनिवार ४ ऑक्टोबर पासून ६ ऑक्टोबर पर्यंत अंतिम प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहे.
विधानसभा अध्यक्ष व शालेय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक ३० सप्टेंबर रोजीला झालेल्या बैठकीतील निर्देश आणि राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करुन विद्याध्यर्थ्यांसाठी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची शेवटची संधी देण्यात आली आहे.
४ ऑक्टोबर पासून होणार्या अंतिम प्रवेश फेरीच्या प्रक्रियेदरम्यान ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजतापासून ते ०६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत विद्यार्थी नविन नोंदणी, प्राधान्यक्रम भरणे, प्राधान्यक्रमात बदल करता येणार आहे.या फेरीमध्ये अर्ज भरताना विकल्प भरण्याची व नोदणीची सुविधा अंतिमतः देण्यात येणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी या फेरीमध्ये विकल्प भरले आहेत त्यांच्या प्राधान्यक्रम विकल्पानुसार (11th admission) कनिष्ठ महाविद्यालय न मिळाल्यास केवळ अशा विद्यार्थ्यांना पुनश्चः रिक्त जागा दर्शवून रिक्त असलेल्या जागा विचारात घेवून विकल्पात बदल करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. या बदल केलेल्या विकल्पानुसार कनिष्ठ महाविद्यालय गुणानुक्रमे देण्यात येईल.
ज्या विद्यार्थ्यांंनी विकल्प नोंदविला नाही ,त्यांना त्यास्तरावर गुणानुक्रमे महाविद्यालयाची अलॉटमेंट करण्यात येणार नाही. तद्नंतरही गुणानुक्रमे कनिष्ठ महाविद्यालय न मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांना पुन्हा विकल्प नोंदविण्याची सुविधा देण्यात येणार आहे. या बदल केलेल्या विकल्पानुसार कनिष्ठ महाविद्यालय गुणनुक्रमे देण्यात येईल.
अनुक्रमांक ३ व ४ मधील पध्दतीने कनिष्ठ महाविद्यालय अलॉट न होणार्या (11th admission) विद्यार्थ्यांना प्रत्येक अलॉटमेंट नंतर विकल्प बदलण्याची सुविधा शेवटच्या विद्यार्थ्यांस महाविद्यालय अलॉटमेंट होईपर्यंत देण्यात येणार आहे. यानंतर प्रत्यक्षात कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्याचे वेळापत्रक दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ नंतर देण्यात येईल. त्या दरम्यान प्रवेश करणे आवश्यक असेल असे परीपत्रकात म्हटले आहे.




