प्रभाग समिती कार्यालय, मनपा मुख्यालय, मनपा संकेतस्थळावर पाहता येणार
परभणी (Parbhani Municipal Corporation) : शहर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना मंगळवार १४ ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. महापालिका प्रभाग समिती कार्यालय, मनपाचे मुख्यालय आणि संकेतस्थळावर अंतिम प्रभाग रचना पाहण्यास उपलब्ध आहे.
परभणी महापालिका (Parbhani Municipal Corporation) सभागृहाची मुदत संपुन अडीच वर्षाचा कालावधी झाला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु करण्यात आली आहे. महापालिकेच्या सोळा प्रभागासाठी प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. या प्रभाग रचनेवर आलेल्या हरकती, सूचनांवर सुनावणी घेण्यात आली. प्रभाग रचने बाबत दाखल ७१ आक्षेप अर्जापैकी ६० अर्जदारांनी उपस्थिती नोंदवत आक्षेप दाखल केले होते. त्यावर सुनावणी पार पडली. आता राज्य निवडणुक आयोगाच्या मान्यतेने परभणी शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतीम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.
प्रभाग रचनेचा नकाशा नटराज रंग मंदिर मनपा कार्यालय, कल्याण मंडपम मनपा कार्यालय तसेच (Parbhani Municipal Corporation) महापालिकेच्या मुख्यालयातील निवडणुक विभाग हॉल येथे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या संकेतस्थळावर देखील अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रभाग रचनेमध्ये अनपेक्षित बदल करण्यात आल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेत बदल झालेले नाहीत.




