मानोरा (MLA Sanjay Rathod) : बंजारा समाजाचे नेते माजी मंत्री संजय राठोड यांना नागपूर येथील मंत्री मंडळ विस्तार सोहळ्यासाठी शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून मंत्री पद बहाल करण्यासाठी बोलाविल्याने उलटसुलट चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे. आज त्यांनी चौथ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली.
रविवारी नागपूर येथे महायुती सरकारचा (Maharashtra cabinet) मंत्री मंडळाचा विस्तार होणार आहे. अनेक माध्यमांनी आमदार संजय राठोड (MLA Sanjay Rathod) यांना मंत्री पदाचा डच्चू मिळणार, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांचा गेम होणार ? असल्याचे सुतोवाच केले होते. तेंव्हा राज्यातील बंजारा बांधव समाजातून नाराजी व्यक्त होत होती. मंत्रीपद मिळावे यासाठी महंत मंडळींनी बंजारा काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे बैठक आयोजित करून माजी मंत्री संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्याचे मंत्री मंडळ विस्ताराच्या आदल्या दिवशी ठरविले होते.
समर्थकांनी परमहंस पोहरादेवी येथील देवी जगदंबा माता मंदीर तसेच संत सेवालाल महाराज व संत डॉ रामराव बापू यांच्या समाधीस्थळी आणि धामणगाव देव येथील परमहांस मुंगासाजी माऊली येथे जलाभिषेक करून देव व संतापुढे साकडे घातले होते. शेवटी मंत्रीपदाच्या शपथ साठी माजी मंत्री संजय राठोड (MLA Sanjay Rathod) यांना फोन आल्याने बंजारा समाजात उत्साह निर्माण झाला आहे. (Maharashtra cabinet) शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा मंत्री पदासाठी संधी दिली आहे. ही मंत्री पदाची चावथ्यादा संधी आहे. या संधीचे सोने करत महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणार, असे सांगत त्यांचे आभार मानले.