मानोरा(Washim) :- मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे भुली येथील ग्रामपंचायत मध्ये सचिव व सरपंच यांनी १४ वा आणि १५ वित्त आयोगातील काही व इतर कामे कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांची उचल करत कामेही रुपयाचा भ्रष्टाचार (Corruption) केला आहे.
लाखो रुपयांची उचल करत कामेही रुपयाचा भ्रष्टाचार
सदरील केलेल्या भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी तसेच उपोषण कर्ता ग्राम रोजगार सेवक प्रकाश चव्हाण यांना कामावरून कमी केल्याप्रकरणी दि. ५ ऑगस्ट पासून पंचायत समिती आवारात उपोषणकर्त्यानी बेमुदत आमरण उपोषणाला प्रारंभ केला होता. आठवडा भरानंतर रोजगार सेवक पदी तात्काळ पूर्ववत करण्याचे व भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करण्याचे लेखी पत्र आणि आश्वासन गट विकास अधिकारी यांनी दिल्याने उबाठाचे नेते तथा माजी विज मंडळ सदस्य अनिल राठोड यांच्या हस्ते शनिवारी उपोषणाची सांगता करण्यात आली. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले होते की, मौजे भुली ग्राम पंचायतचे सचिव व सरपंच यांनी भूमिगत गटार कामाचे जवळपास ३१ लक्ष रूपये दाखविला आहे. १४ व १५ वित्त आयोग अंतर्गत विविध विकास कामे, सभामंडप, सिमेंट काँक्रिट रस्ता यासह अनेक बाबीवर खर्च दाखवून लाखो रुपयांचा खर्च करून सचिव, सरपंच यांनी संगनमतीने भ्रष्ट्राचार केलेला आहे.
तसेच मला रोजगार सेवक पदावरून पायउतार केले. त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला बेमुदत आमरण उपोषणाला सुरूवात केली होती. रोजगार सेवक पदी नियुक्ती करण्याचे लेखी पत्र आणि भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन बिडीओ यांनी दिल्याने उपोषणकर्ता चव्हाण यांनी उपोषण मागे घेतले. उपोषण मंडपात राष्ट्रवादी काँगेस शरद पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पंडीत जाधव, दिलीपराव चव्हाण, शेतकरी नेते मनोहर राठोड, उबाठाचे भोला राठोड, माजी सरपंच भावराव चव्हाण, जय चव्हाण , श्याम राठोड, रोहिदास चव्हाण, अमोल राठोड, सुदाम तायडे, प्रफुल खडसे, शिवा ठाकरे, शामराव महाराज, मनरेगाचे कनिष्ठ सहाय्यक सुरेश चाटी, ग्राम रोजगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.