चिखली (Buldhana) :- चिखली तालुक्यातील मेरा बु येथील श्री शिवाजी हायस्कुल व कनिष्ठ विद्यालयामध्ये विद्यार्थीना मैदानी खेळासह, संगणक शिक्षणाचा बटट्याबोळ अशा मथळयाखाली दैनिक देशोन्नती पोर्टल न्यूज मध्ये दिनांक 25 नोव्हेंबर रोजी बातमी प्रकाशीत करण्यात आली होती. बातमी प्रकाशीत होताच सर्वत्र शिक्षण विभागात खळबळ उडाली असल्याने शाळा प्रशासनावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
शाळा प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार सुरु
महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालयामार्फत (Maharashtra State Directorate of Sports) प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील नियमित विद्यार्थ्यांसाठी तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर वयोगटांनुसार मुला-मुलींसाठी वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या गुणवंत खेळाडूंना त्यांच्या कामगिरीबद्दल लाभ दिला जातो. तसेच बोर्डाच्या परीक्षेमध्ये अशा विद्यार्थ्यांना २५ गुणही दिले जातात. शासकीय नोकऱ्यांमध्येही या विद्यार्थ्यांना आरक्षण व प्राधान्य दिले जाते.त्याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी शाळांमधील संगणक शिक्षण हा अल्पकालीन आनंद आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉर्पोरेट शाळांच्या समकक्षांसह समान खेळाचे मैदान देण्यासाठी सरकारने शाळां (Govt. School) मध्ये संगणक उपलब्ध करून दिले आहेत. मात्र या विद्यालयात शाळा प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार सुरु असल्याने विद्यार्थ्यांसाठी संगणक शिक्षण मृगजळ बनले आहे.
तर विद्यार्थीसाठी कुठेही मैदान (Ground)उपलब्ध नसल्याने क्रीडा स्पर्धांमधून या शाळांमधील विद्यार्थ्यांना वगळण्यात येत आहे. त्यामुळे हे विद्यार्थी विविध लाभापासून वंचित राहत असल्याने विद्यार्थी व पालकामध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून गावाकऱ्याचे या शाळा प्रशासनाच्या मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे एकीकडे नव्याने रुजू झालेले नवीन प्राचार्य हे काहीतरी बदल घडवतील अशी पालकाना अपेक्षा होती परंतु कोणताही बदल न होता दिवसेंदिवस संगणक शिक्षणाचा बट्ट्याबोळ होत चालला असून विद्यार्थी क्रीडा स्पर्धा पासून वंचीत राहू लागले आहे. त्यामुळे पालकात नाराजीचे वातावरण पसरले आहे अशा मथळ्याखाली दैनिक देशोन्नती पोर्टल मध्ये बातमी प्रकाशीत करण्यात आली बातमी प्रकाशीत होताच सर्वत्र खळबळ उडाली.
शाळा प्रशासनावर प्रश्न चिन्ह निर्माण होवू लागले आहे.तरी शिक्षण विभागाने तात्काळ दाखल घेवून येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण व मैदान खेळापासून वंचीत ठेवू नये अशी पालका कडून ओरड होत आहे.