चिखली (Budhana) :- वाळू माफियाकडून रात्रभर मोठया प्रमाणावर अवैध रेतीची वाहतूक (Illegal sand transport) केली जात आहे. हा प्रकार शिंदे गटाचे शिवसेना(Shiv Sena) उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांनी त्यांच्या मोबाईल (Mobile) मध्ये कैद करत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कळविले होते.
पोलिस प्रशासन रस्त्यावर उतरून गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करत कार्यवाह्या करत आहे
देऊळगाव मही खडकपूर्णा प्रकल्पाचे चिखली तालुक्यात इसरुळ गावा लगत रेतीचे मोठे नदी पात्र आहे. या नदी पात्रातून दररोज रात्रभर मोठया प्रमाणावर वाळू माफिया हे अवैध रेतीची वाहतूक करतात. या अवैध रेती वाहतूकीवर पायबंद घालण्यासाठी महसूल आणि पोलिस प्रशासन रस्त्यावर उतरून गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करत कार्यवाह्या करत आहे. मात्र वाळू माफियावर कार्यवाही (Proceedings) होवूनही अवैध रेतीची वाहतूक बंद होत नाही उलट बंदच्या नावाखाली मोठया प्रमाणावर अवैध रेतीची वाहतूक होते. त्यातच दोन दिवसापूर्वी इसरुळचे माजी सरपंच पती संतोष भुतेकर यांनी अवैध रेतीचे भरलेले टिप्पर (tipper)आडवून बॅनरवरील जिल्हाधिकारी यांच्या फोटोला जोड्याने झोडपून महसूल विभागाचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर बदनामीचे गुन्हे दाखल केले. आता तर गेल्या आठ दिवसा पासून महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन सुरू आहे.
वाळू माफिया राजरोसपणे रात्रभर अवैध रेतीची वाहतूक करू लागले
त्यामुळे महसूल विभागाच्या (Department of Revenue) अधिकाऱ्यांचे अवैध रेती वाहतूकीकडे दुर्लक्ष होणार आहे आणि गुन्हे दाखल करूण करूण किती कार्यवाह्या करतील असे म्हणत वाळू माफिया राजरोसपणे रात्रभर अवैध रेतीची वाहतूक करू लागले. त्यामुळे बदनामीची महसूल विभागाने कितीही गुंहे दाखल केले तरी अवैध रेती वाहतूक चालू देणार नाही अशी भूमिका घेवून इसरुळ येथील माजी सरपंच पती तथा शिवसेना
(Shiv Sena) उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांनी गावकऱ्यांना सोबत घेवून १८ जुलै रोजी रात्री १० वाजता अवैध रेतीचे आठ वाहने अडवून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. अधिकारी येवून दंड व कार्यवाही करतील या भीतीपोटी वाहन चालकांनी वाहनातील रेती रोडवर खाली टाकून पसार झाले हा प्रकार संतोष भुतेकर यांनी मोबाईल मध्ये कैद करून उघडकिस आणला.
बातमी प्रकाशित होताच सर्वत्र खळबळ उडाली आणि तात्काळ तहसिलदार संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार खाडे, मंडळ अधिकारी सोनूने, तलाठी चव्हाण यांनी रातोरात घटनास्थळी येवून पंचासमक्ष आठ वाहनातील रोडवरील अवैध रेती जप्त केली .आता जप्त केलेल्या अवैध रेती चा दंड काय होणार म्हणून वाळू माफियांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यावेळी माजी सरपंच संतोष भुतेकर , दीपक पुंगळे, समाधान भुतेकर, शब्बीर सेट दौद भाई , विठ्ठल भुतेकर, अविनाश भुतेकर, शेख मोशीन लालू यासह अनेक ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते .