पुसद (Pusad Revenue Action) : अवैध कोण खनिज ची वाहतूक करणाऱ्या तीन वाहनावर कारवाई दि. 6 नोव्हेंबर रोजी महादेव जोरवर तहसीलदार पुसद यांनी त्यांच्या पथकासह मागील 12 तासात पुसद परिसरात होत असलेल्या अवैध गौण खनिज वाहनावर कारवाई केली.
पुसद परिसरात होत असलेल्या व शहरांमध्ये भरधाव वेगाने अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई मोहीम राबवली असता मौजे धनकेश्वर परिसर तसेच (Pusad Revenue Action) पुसद परिसरातून आदिलाबाद वरून होत असलेल्या रेती, गौणखणीच्या अवैध वाहतुकीचे तीन वाहने मागील बारा तासात पकडून त्यावर कारवाई करण्यात आली व सदर वाहने ही तहसील परिसरात लावण्यात आली. सदर कारवाई ही तहसीलदार पुसद महादेव जोरवर यांच्यासह नायब तहसीलदार गणेश कदम मंडळ अधिकारी पुसद मयूर मस्के ग्राम महसूल अधिकारी पुसद खंड एक निरंजन वानखडे ग्राम महसूल अधिकारी पुसद खंड दोन कामराज चौधरी व ग्राम महसूल अधिकारी काकडदाती इंदल चव्हाण यांचे संयुक्त पथकाने केली आहे.
शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून, राजकीय व लोकप्रतिनिधींच्या व (Pusad Revenue Action) महसूल प्रशासनाच्या पाठबळामुळे रेती तस्करांचा जीवघेणा हैदोस सुरू आहे, शहरातून छोटे डुगे ( रेती तस्कर वाहन ) भरधाव वेगाने चालवत आहेत. आहेत तर. रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा आहे.” दैनिक देशोन्नतीने ” सातत्याने मालिका चालविल्यामुळे शेवटी राज्य परिवहन अधिकाऱ्यांना पुसद मध्ये मुक्कामी राहावे लागले, तर तहसीलदारांनी वरील प्रमाणे कारवाई केली. हे विशेष.