पोलिसांच्या तपासात खोदा पहाड निकाला चुहा प्रकार उघडकीस
देशोन्नती वृत्त संकलन
चिखली/बुलढाणा (Mandir Peti theft) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी हे गावातील अवैध दारू विक्रेत्यांना पाठीशी घालत असल्याने गावात लहान मोठ्या चोऱ्याचे प्रमाण अधिकच वाढतच चालले आहे अशा या प्रकरणामुळे 4 नोव्हेबर रोजी रात्रीला अद्यात चोरट्यानी एकाच रात्री तीन मंदिरातील दान पेट्या फोडून (Mandir Peti theft) लाखोचा माल चोरून नेला अशी बातमी प्रकाशित करण्यात आली होती. बातमी प्रकाशीत होताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला असता दोन पेटी मध्ये नोटा नसून चिल्हर मिळून आली त्यामुळे पोलिसांनी खोदा पहाड निकला चुवा असा प्रकार उघडकीस आला आहे.
येथे CLICK करा: चोरट्यानी एकाच रात्री तीन मंदिरातील दान पेट्या फोड्ल्या…
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेरा बु येथे भव्यदिव्य असलेले हनुमान मंदिर, महादेव मंदिर,संतोषी मातेचे मंदिर असे तीन मंदिरे आहेत. या मंदिरापैकी एक हनुमान मंदिरावर पूजारी म्हणून दगडूजी वाळेकर हे गेल्या 10 वर्षा पासून पूजा पाठ करतात. मंदिरा मध्ये एक दान पेेटी ठेवलेली होती. दरवर्षी या दान पेटीत 20 ते 30 हजार रुपये भाविक भक्त दान करतात. मात्र 3 नोव्हेबर रोजी रात्रीला कोणत्यातरी चोरट्याने (Mandir Peti theft) मंदिराचा दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला आणि मंदिरातील दान पेटी फोडून त्यातील हजारो रुपये लंपास केले. हा प्रकार 4 नोव्हेबर रोजी सकाळी पूजारी हे पूजा करण्यासाठी मंदिराजवळ गेले असता मंदिराचा दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले.
तसेच दान पेटीचे सुध्दा कुलूप फोडलेले दिसलें त्यामुळे पूजारी यांनी लगेच या घटनेची माहिती रमेश पडघान, हभप शिवाजी पडघान, ग्रा. प. सदस्य पुरुषोत्तम पडघान,विकास पडघान फोटो ग्राफर, संदीप चेके, यांना दिली असता तेवढ्यात उपस्थित काही जणांनी सांगीतलें की गावातील महादेव मंदिर,व संतोषी मातेचे मंदिर या दोन मंदिरातील सुध्दा दान पेट्या फोडल्या आहेत असे सांगताच मंदिर संस्थेच्या संचालक मंडळानी अंढेरा पोलीस स्टेशनला जावून तक्रार दिली. या (Mandir Peti theft) तक्रारी वरून दैनिक देशोन्नती न्यूज पोर्टलवर बातमी प्रकाशीत करण्यात आली बातमी पाहून लगेच ठाणेदार विकास पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जावून पंचासमक्ष पंचनामा केला असता मंदिराच्या दान पेटीत नोटा नसून चिल्हरच आढळून आली त्यामुळे पोलिसांनी खोदा पहाड निकला चुवा अशी प्रकार पाहायला मिळाला.