नांदगाव पेठ(Amravati):- प्रेमप्रकरणातुन युवतीला व तीच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची तसेच युवतीचे फोटो व व्हिडिओ मार्फिंग (Video morphing) करून व्हायरल करण्याची सातत्याने धमकी(Warning) देणाऱ्या माथेफिरू मजनूविरोधात उशिरा का होईना मात्र शनिवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान नांदगाव पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.सोमेश्वर जाधव रा.सालोरा धोत्रा असे त्या माथेफिरू आरोपीचे नाव असून गुन्हा दाखल झाल्यानंतर मात्र तो गावातून फरार झाल्याची माहिती आहे.
पीडिता व कुटुंबीय अजूनही भीतीच्या सावटात
दोन वेळा तक्रार दिल्यानंतर नांदगाव पेठ पोलिसांना घटनेचे गांभीर्य कळले नव्हते अखेर लोकप्रतिनिधिंनी याप्रकरणी हस्तक्षेप केल्यानंतर व पोलिसांना धारेवर धरल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली.घटनेचे सविस्तर वृत्त असे की,सावर्डी येथील २० वर्षीय पीडित युवती मागील वर्षी शिवणगाव येथे बारावीचे शिक्षण घेत असतांना तिच्या वर्गात असलेल्या मैत्रिणीचा भाऊ सोमेश्वर जाधव हा पीडितेच्या वाढदिवसानिमित्य(birthday) सावर्डी येथे आला होता.त्यानंतर दोघांची मैत्री झाली व नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.परंतु पीडिता उच्चशिक्षण घेत असल्याने तसेच सोमेश्वर जाधव हा पीडितेला मानसिक त्रास (mental distress) देत असल्याने तिने त्याच्यासोबत बोलणे सोडले.
पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास केला विलंब
मात्र गेल्या एक महिन्यापासून सोमेश्वर जाधव हा पीडितेला वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून (Mobile number)फोन करून माझ्याशी बोल नाहीतर मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवानिशी मारेल अश्या धमक्या देत होता.त्यानंतर तिने बोलणे बंद केले व भीतीमुळे तिने जावयाचे घर गाठले त्याठिकाणी सुद्धा फोनवरून पीडितेला व तिच्या जावयाला बघून घेण्याची व मारण्याचधमकी देण्यात आली. शेवटी भयभीत झालेल्या युवतीने कुटुंबियांसह १५ जून रोजी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेऊन भयभीत झालेल्या युवतीला व तिच्या कुटुंबियांना आधार न देता तसेच परत पाठवले.
युवतीच्या घरी जाऊन युवतीचा हात पकडून माझ्यासोबत चल नाहीतर मी जीवाचे बरे वाईट करून घेईल
त्यांनतर त्याने फोन वरून संपर्क केला मात्र युवतीने प्रतिसाद दिला नाही म्हणून तो चक्क १९ जून रोजी दुपारी चार वाजता सावर्डी येथील युवतीच्या घरी जाऊन युवतीचा हात पकडून माझ्यासोबत चल नाहीतर मी जीवाचे बरे वाईट करून तुम्हाला सर्वांना फसवेन असे म्हणत तिला घरातून बाहेर ओढले त्यानंतर तिला वाचवायला आलेली युवतीची आई, काकू व बहिणीला अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना सुद्धा जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर कुटुंबियांचे रौद्ररूप बघून तो तेथून पळून गेला. त्यानंतर लगेच युवतीने नांदगाव पेठ पोलिसांत लेखी तक्रार दिली मात्र तरीही पोलिसांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.अखेर वृत्तपत्रांनी पीडित युवतीची आपबिती प्रकाशित केल्यानंतर लोकप्रतिनिधींनी पोलिसांना जाब विचारला अखेर वाढलेला दबाव बघून पोलिसांनी शनिवारी रात्री १० वाजता आरोपी सोमेश्वर जाधव याच्यावर भादंवि ३४५,३५४(अ) ३५४ (ड),५०४,५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला मात्र आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती आहे.