हिंगोली(Hingoli):- येथील नगरपरिषदने नियमबाह्य पद्धतीने वाढवलेल्या मालमत्ता करास स्थगिती देण्याची मागणी आ.तान्हाजी मुटकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis)यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव मालमत्ता करास तात्पुर्ती स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत.
कर वाढल्यामुळे सर्व नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त
येथील नगर परिषदने सन २०२४-२५ ते २०२७ ते २८ या चार वर्षाकरिता नियमबाह्य पद्धतीने कर वाढल्यामुळे सर्व नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. या करास स्थगितीची मागणी करण्यात येत आहे. हिंगोली नगरपरिषदेने करात वाढ करताना सहा पटीने वाढ करून घरपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेल्या करवाढीप्रमाणे योग्य अपिलीय अधिकारी यांच्याकडे दाद मागण्यासाठी वेळ देण्यात आली नसल्याने हिंगोली शहरवासीयात प्रचंड नाराजी पसरलेली आहे. त्यामुळे शहर वाशीयांच्या वतीने कर वाढीस तात्काळ स्थगिती देऊन नव्याने कर धोरण करण्याबाबतचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी आ.तान्हाजी मुटकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
यावरुन मुख्यमंत्री यांनी तात्पुर्ती स्थगिती देण्यात यावी असे आदेशित केली आहे. या प्रकरणी संपुर्ण माहिती सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यामुळे हिंगोलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.