अकोला (Akola):- अंतर्गत दिग्रस बु, येथील आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद (Zilha Parishad) केंद्रीय शाळेच्या जुन्या जीर्ण वर्गखोल्या मागील अनेक वर्षांपासून पाडण्यात आल्या होत्या मात्र, आतापर्यंत नवीन वर्गखोल्या बांधकामास प्रारंभ झाला नाही. याबाबत लोकमत ने ९ आक्टोबर रोजी वृत्त प्रकाशित करताच ११ आक्टोबर ला सायंकाळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर यांनी कामाचे उदघाटन करून १४ आक्टोबर ला कामास प्रारंभ करण्यात आला आहे.या कामाला सुरुवात झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये मोठा आनंद दिसून येत आहे.
विद्यार्थी व पालकांमध्ये मोठा आनंद
आज रोजी हिरवी नेट चा आडोसा घेऊन विद्यार्थी गिरवताहेत धडे त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागेची अडचण येत होती, झाडाखाली बसून ज्ञानार्जनाचे धडे गिरवावे लागत होते. या प्रकारामुळे अनेक विद्यार्थ्यांचे (Students) शैक्षणिक नुकसान होत असून या गँभिर विषयाकडे संबधित प्रशासन व लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालक वर्ग करण्यात आला होता.परंतु आता यामुळे शिक्षण उच्चा दर्जाचे होणार असून कोणीही विद्यार्थी शाळेतून जाणार नाही अशी पालक यांनी जबाबदारी घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्व सोयी उपलब्ध
स्थानिक जिल्हा परिषद शाळेत १ ते ८ वीपर्यंत शिक्षण आहे. पातूर तालुक्यात सर्वप्रथम सेमी इंग्रजी (कॉन्व्हेंट) या शाळेत सुरू करण्यात आले होते.
या शाळेत तुलगा, दिग्रस खुर्द, दिग्रस बु., तांदळी आदी गावांतील विद्यार्थी शिकायला येतात. या शाळेत विज्ञान खोली, संगणक खोली आदी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्व सोयी उपलब्ध आहेत. परंतु, वर्गखोल्या नसल्याने अडचण वाढली होती. या वर्गखोल्या बांधण्यास सुरुवात झाली असून या कामास सुरवात वेळी सरपंच आशा सुधाकर कराळे,प्रमोद गवई,सुदर्शन सिरसाट,विजय गवई, मिलिंद गवई,सुधा कराळे,पालक,शिक्षक आदी गावतील मंडळी उपस्थित होती.