चिखली (Buldhana) :- शेतातील कामे आटोपून घराकडे मोटार सायकलवर परत जात असताना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यामध्ये मोटार सायकल चालकाचा रोडवर पडून मृत्यू झाल्याची घटना 17 डिसेंबर रोजी भरोसा ते दे घुबे रोडवर सकाळी उघडकीस आली होती. सदर घटनेत पोलिसांनी प्रेताचे पोस्टमार्टम (Post mortem) केले असता सदर तरुणाचा मृत्यू हा अद्यात वाहनाने नसून रोही जणांवराच्या धडकेने झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
स्वतः च्या मोटार सायकलवर जात असताना एका अज्ञात वाहनाची मोटार सायकलला जोरदार धडक
अंढेरा पोलीस स्टेशन (Police Station)अंतर्गत येणाऱ्या मेरा खुर्द येथील शरद श्रीहरी ठाकूर वय 46 वर्ष यांनी पोलीस स्टेशनला लेखी स्वरूपात माहिती दिली की. मेरा खुर्द येथील राहीवाशी असलेले पवन सुनिल ठाकूर वय 36 वर्ष यांचे शिक्षण बीएबीएड झालेले असून त्यांची पत्नी जाफ्राबाद येथे नगर पालिका मध्ये नौकरी करते. त्यांची शेती मेरा खुर्द येथे असल्याने ते शेती कामासाठी मेरा खुर्द येथे ये जा करत होते. 17 डिसेंबर रोजी शेतातील कामे आटोपून तो जाफ्राबाद गावाकडे स्वतः च्या मोटार सायकलवर जात असताना एका अज्ञात वाहन चालकाने मोटार सायकलला जोरदार धडक दिली. रात्रीची वेळ असताना बराच वेळ पवन ठाकूर हे जखमी अवस्थेत रोडवरच तडफडत होते. परंतु काही वेळाने रस्त्यावरूण काही वाहन जात असताना त्यांनी रोडवर पडलेला व्यक्ती पाहला आणि एका पाठोपाठ आठ दहा जण गोळा झाले मात्र तेवढ्यात त्याठीकाणी मेरा खुर्द येथील बाळू वराडे हे जात होते तेव्हा त्यांनी जखमी तरुणाला पाहुण सदर तरुण हा गावातीलच आहे म्हणून त्यांनी लगेच जखमीला एका वाहनात टाकून चिखली येथे रुग्णालयात हलविले. परंतु डॉक्टरांनी त्यांनामृत घोषित केले होते .
मृतक हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता व मृतक मुलाला दोन मुली आहेत
या घटनेची माहिती लगेच त्यांनी त्यांच्या नातेवाईकाना दिली. हा मृतक आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता व मृतक मुलाला दोन मुली आहेत. त्यामुळे आई वडिलांचा एकूणता एक मुलगा व त्यांना दोन मुली आहेत. अशी माहिती मेरा खुर्द येथील बाळू वराडे यांनी दैनिक देशोन्नतीला(Deshonnati) दिली होती यावरून बातमी दै देशोन्नती मध्ये प्रकाशीत करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी सदर मृतकाचा पोस्टमार्टम करुण डॉक्टरराकडून अहवाल घेतला असता सदर तरुण हा अद्यात वाहनाच्या धडकेत मृत्यू(Death) झालेला नसून तो रोही जणांवराच्या धडकेनने दगावला असे निष्पन्न झाले आहे असे अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांनी सांगितले. यावेळी मृतकाचे नातेवाईक शरद श्रीहरी ठाकूर वय 46 वर्ष यांच्या लेखी जबाब वरून डायरी अंमलदार आंधळे यांनी कलम 194 नुसार मर्ग दाखल केला आणि तपास बिट अंमलदार कैलास उगले यांच्याकडे सोपावीला आहे.