समन्वय समितीचे प्रमुख विश्वनाथ घुगे यांची माहिती
हिंगोली (Finance Dept Morcha) : राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत सफाई कामगार व कर्मचाऱ्यांची वेतनामुळे उपासमार होत आहे तसेच शासनाच्या वित्त विभागाची आडमुट भूमिका व नगर विकास विभागाच्या ठिसाळ कारभारामुळे समन्वय सुमित तर्फे 9 सप्टेंबरला आझाद मैदान ते मंत्रालय मुंबई या दरम्यान (Finance Dept Morcha) मोर्चाचे आयोजन केले असल्याची माहिती समन्वय समितीचे प्रमुख (Vishwanath Ghuge) विश्वनाथ घुगे यांनी दिली आहे.
राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांना शासनामार्फत वेतनासाठी दिल्या जाणाऱ्या सहाय्यक अनुदानाबाबत वित्त विभागाची फार मोठी भूमिका व नगरविकास विभाग आणि नगरपालिका प्रशासन संचालनालय यांच्या ढिसाळ कारभारामुळे राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत मधील कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यापासून वेतनासाठी हाल होत आहेत.
वेतनामुळे सफाई कामगार व कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून बँकेचे व विमा कंपन्यांचे हप्ते थकीत होत असल्याने कर्मचाऱ्यांचा सिबिल स्कोर खराब होत आहे अनेक वेळा निवेदन देऊनही शासन स्तरावर बैठकाही घेण्यात आल्या परंतु त्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे समन्वय समितीला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली याकरता 9 सप्टेंबर रोजी भव्य मोर्चा बाबत प्रलंबित मागण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
चार महिन्यांचे थकीत वेतन एकाच वेळी देऊन प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेच्या आज कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेच पाहिजे, नगरपंचायत मधील राहिलेले सर्व कर्मचारी सफाई कामगार संगणक ऑपरेटर आदी सर्व कर्मचाऱ्यांचे विनाअट समावेशन करावे, नगरपंचायतची सेवा स्थापना दिनांक पासून ग्राह्य धरून थकीत वेतन अदा करावे, आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना एक स्तर वेतन श्रेणी लागू करावी, आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना एक स्तर वेतनश्रेणी लागू करावी, सफाईचा ठेका पद्धती बंद करून प्रत्येक सफाई कामगारांना हक्काचे घर बांधून द्यावे, नगरपरिषद आस्थापनेच्या कर्मचाऱ्यांनी वेतन पडताळणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करावी स्वच्छता निरीक्षकांची वेतनश्रेणी 2800 चे ऐवजी 4200 रुपये करून त्यांचे अधिकार व कर्तव्य निश्चित करणे.
2005 च्या नंतरच्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वेतनाचे धोरण निश्चित होईपर्यंत जुनी पेन्शन लागू करावी, नगरपरिषद कर्मचाऱ्यांना संवर्ग समावेशनाची एक संधी द्यावी, नगर परिषद नगरपंचायत मधील कंत्राटी कामगारांना कायम करावे आधी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दिले असून निवेदनावर समन्वय समितीचे प्रमुख विश्वनाथ घुगे (Vishwanath Ghuge) , सुरेश पोसतांडेल, नागेज कंडारे, पी. बी भातकुले, दीपक रोडे धर्मा खिल्लारे, मारुती गायकवाड, अनुप खटारे आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत या मोर्चामध्ये जास्तीत जास्त नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी सफाई कामगार कंत्राटी कामगारांनी सहभागी व्हावे असे आवाहन समितीचे प्रमुख विश्वनाथ घुगे (Vishwanath Ghuge) यांनी केले आहे.
