सारंगवाडी येथे पुरात वाहून मृत्यू झालेल्या चैतन्याच्या कुटुंबाला आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते शासनाकडून चार लाख रुपयाची आर्थिक मदत
औंढा नागनाथ/हिंगोली (MLA Raju Bhaiya Navghare) : औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी येथे एक सप्टेंबर रोजी सायंकाळी गावाकडे जात असताना कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहात तीन जण वाहून गेले होते. यामध्ये एकदम ताबडतोब पाण्याबाहेर निघाला. तर दुसरे संजय ठोंबरे यांना रात्री उशिरा रेस्क्यू करून पाण्या बाहेर काढले पण दुर्दैवाने दहा वर्षीय चैतन्या ठोंबरे या चिमुकल्या मुलीच्या दुर्दैवी मृत्यू झाला होता.
या मुलीच्या कुटुंबियांना शासनाकडून आज दिनांक सहा ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी एक वाजे दरम्यान आमदार राजू भैया नवघरे (MLA Raju Bhaiya Navghare) यांच्या हस्ते चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार हरीश गाडे सहाय्यक गटविकास अधिकारी बालाजी गोरे तलाठी ज्योती स्वामी प्रशांत शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.