कंत्राटदाराने लाटले लाखोंचे देयक, काम बंद आंदोलनाचा इशारा
सुधिर गोमासे
तुमसर (Chikhala mill Contractor) : खनिज संपत्तीने नटलेल्या तुमसर तालुक्यातील चिखला मॉईल येथे भूमिगत खाणीत काम करणार्या मजुरांची तेथील कंत्राटदाराने आर्थिक पिळवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खाणीतून मौल्यवान उपज काढण्याकरिता ठेकेदारी पद्धतीने मजूर पुरविण्याचे (Chikhala mill Contractor) कंत्राट मॉईल प्रशासनाने काढले होते. सदर कंत्राट सितासावंगी येथील एका स्थानिक कंत्राटदाराला प्राप्त झाले होते. त्यातून संबंधित ठेकेदाराने शेकडो मजूर मॉईल पुरविले होते. मात्र मजुरीवर जाणार्या त्याच कामगारांच्या नियोजित दैनिक भत्ता, त्यातील नियमानुसार कपात व दिवाळीच्या सणात बोनस म्हणून मिळणार्या हक्काच्या पैश्यांवर त्या कंत्राटदाराने डल्ला मारल्याचा आरोप तब्बल शेकडो मजुरांनी केला आहे.
त्यातूनच ऐन दिवाळीत शनिवार, दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी संतापलेल्या मजुरांनी खान प्रबंधकाचे कार्यालय गाठून ठिय्या आंदोलन केला होता. दरम्यान दैनिक मजुरीच्या रकमेतून संबंधित कंत्राटदार प्रति मजूर २०० ते २५० रुपयांवर डल्ला मारत आहे. बोनासची मागणी करण्यास गेलेल्या मजुरांना उडवा उडविची उत्तरे देऊन संबंधित (Chikhala mill Contractor) कंत्राटदाराने आर्थिक पिळवणूक केल्याचे मजुरांना लक्षात आले.
कंत्राट रद्द करण्याची मागणी
एका पीडित युवक मजुराने बोलतांना त्या कांत्रादराच्या मनमर्जी कामावर बोट ठेवला. शिक्षित असल्याने होत असलेली फसवणूक त्यांच्या लक्षात आली. त्या युवकाच्या मते खाणीत अडीचशे हून अधिक मजूर कंत्राटदाराने पुरविले आहे. प्रत्येकाच्या मानधनातून कंत्राटदार लाटत असलेली ती रक्कम कोट्यवधींच्या घरात असल्याचे त्याने सांगितले. येथे बहुतांश आदिवासी मजूर हे अशिक्षित असल्याचा फायदा संबंधित कंत्राटदार घेत आहे. त्यात कामावर घेण्याची अवैध दलाली देखील मजुरांचा मनस्ताप वाढविणारी ठरत आहे. त्यामुळे त्याचे (Chikhala mill Contractor) कंत्राट रद्द करून निविदा नव्याने करण्याची मागणी होत आहे.
खानप्रबंधक कार्यालयात मजुरांचा ठिय्या
चिखला खान (Chikhala mill Contractor) प्रबंधक सितासावंगी येथे असल्याने मजुरांनी आपला मोर्चा त्या दिशेने वळविला होता. मजुरांची अफाट गर्दी पाहताच व्यवस्थापक तथा एजंटने कार्यालयातून पळ काढला. त्यावेळी मजुरांची समजूत घालून उपस्थित अधिकार्यांनी वेळ काढून घेतली होती.
उपस्थितीचा बोगस रेकॉर्ड
संबंधित कंत्राटदार कामावर जाणार्या मजुरांच्या उपस्थितीबाबत रेकॉर्ड जतन करतो. मात्र त्यातही वाजवीच्या अवैध सुट्ट्या, रोजीची कपात, ईपीएफच्या रकमेचा घोळ स्वतः मजुरांनी अधिकार्यांच्या निदर्शनात आणून दिला होता.
