ठाणेदारामुळे तरुणामध्ये नवचैनतन्य
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Unemployed youth) : जर मनामध्ये जिद्द आणि काहीतरी वेगळे करून दाखवायची इच्छा असेल तर व्यक्ती कितीही अडचणी आल्या तरी मोठा संघर्ष आणि परिस्थितीवर मात करत ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. असाच एक आगळा वेगळा निर्णय घेत ठाणेदार विकास पाटील यांच्या सकल्पनेतून एका बेरोजगार तरुणाने चहा विक्री करण्याचे दुकान टाकून तरुणामध्ये नवचैतन्य निर्माण केले.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेरा बु येथे बबन पडघान यांना दोन मुले आहेत या दोन्ही मुलांना त्यांनी चांगले शिक्षण दिले परंतु गेल्या अनेक वर्षा पासून सरकारने नौकर भरती काढली नसल्याने शेकडो बेरोजगार तरुण व्यसनधीन होत आहेत तर काही बेरोजगार अवैध धंदयाकडे वळत आहेत. त्यामुळे (Unemployed youth) बेरोजगार तरुणांची प्रगती होत नाही आणि याचा सर्व भार आई वडिलांना सोसावा लागतो.
परंतु गेल्या दिड ते दोन वर्षापासुन अंढेरा पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले ठाणेदार विकास पाटील यांनी एक आगळा वेगळा सकल्प हाती घेवून बेरोजगार तरुणामध्ये नवचैतन्य निर्माम केले आणि मेरा बु येथील बबन पडघान यांची उच्चशिक्षित असलेली दोन्ही मुले नौकऱ्या आभावी भटकंत असल्याचे पाहुण ठाणेदार यांनी त्यांना सहकार्य करत एक गावामध्ये चांगला उद्योग करण्याची सकल्पना दिली आणि (Unemployed youth) लगेच त्यांनी गावात चहा विक्री करण्याचे दुकान टाकले हा अभिनव उपक्रम पाहुण गावकरी आच्छर्य व्यक्त करीत आहेत.
यावेळी ठाणेदार विकास पाटील, पत्रकार प्रताप मोरे, अंभोरे, आंधळे, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पाटील, ग्रा. प. सदस्य अमर पाटील, भाजपनेते निखिल पाटील, शाळा अध्यक्ष रामदास पडघान, मा.मापारी, हभप विजू पाटील, आदी जण उपस्थित होते.




