केळींच्या झाडांचे अचानक लागलेल्या आगीत जळुन नुकसान
परभणी (parbhani):- मानवत तालुक्यातील केकरजवळा येथील काढणीस आलेल्या ५ हजार ५०० जिवंत केळींच्या झाडांचे बुधवार ८ मे रोजी अचानक लागलेल्या आगीत(fire) जळुन नुकसान झाले आहे.
या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, केकरजवळा येथील गट क्रमांक २२३ मधील १ हेक्टर ५० आर क्षेत्रावर महिला शेतकरी(farmer) मथुराबाई सखाराम गायकवाड यांनी केळीची (banana)लागवड केली आहे. एकुण जवळपास ६ हजार केळींच्या झाडांची नोंद असून त्यापैकी ५ हजार ५०० काढणीस आलेले केळीची झाडे बुधवार ८ मे रोजी दुपारी १२.३० च्या दरम्यान लागलेल्या आगीत संपुर्ण जळुन खाक झाली आहेत. हातात आलेले पिक नाहीसे झाल्यामुळे शेतकर्यावर मोठे संकट ओढावले आहे.
आ.मेघना बोर्डीकर यांची जिल्हाधिकार्यांकडे नुकसान भरपाईची मागणी
मानवत तालुक्यातील केकरजवळा येथील महिला शेतकरी मथुराबाई गायकवाड यांच्या शेतातील अचानक लागलेल्या आगीत ५ हजार ५०० केळीच्या झाडांचे नुकसान(Damage to trees) झाले आहे. शेतकर्यानी मानवत तहसिलदार,तालुका कृषी अधिकारी(Agricultural Officer) यांना या संदर्भात लेखी स्वरुपात माहिती कळविली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या अचानक आग लागुन झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याच्या संदर्भात तात्काळ आदेशीत करुन सदरील महिला शेतकर्यास आपती व्यवस्थापना अंतर्गत तात्काळ मदत करण्याचे सहकार्य करावे. असे आ. मेघना बोर्डीकर यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे.