औंढा नागनाथ(hingoli) :- येथील पंचायत समिती कार्यालयाच्या लेखा विभागाला शॉर्ट सर्किटमुळे (short circuit) रविवार रोजी रात्री आठ वाजे दरम्यान आग लागली. यामध्ये संगणकासह महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाली आहेत. औंढा नागनाथ पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात असल्याने याचा मास्टर माईंड कोण हे उघड होणार आहे.
दस्तावेज जळून खाक, कार्यालय परिसरात उलट सुलट चर्चेला उधाण
औंढा नागनाथ येथील पंचायत समिती विभागात लेखा कार्यालय असून शहरी व ग्रामीण भागाचा विकासाचा लेखाजोखा याच विभागातून चालत असतो पंचायत समिती कार्यालय लेखा विभागातील (Accounts Department) अनेक दस्तावेज जळून खाक झाली आहेत. या परिसरात लागलेल्या आगीची उलटसुलट चर्चा सुरू आहे दरम्यान 2 डिसेंबर सोमवारी रोजी दुपारी एक वाजे दरम्यान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी एस राहीरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मोहम्मद शेख, ज्ञानेश्वर गोरे यांनी पंचनामा केला यावेळी गटविकास अधिकारी गोपाळराव कल्लारे, सहाय्यक गटविकास अधिकारी बालाजी गोरे लेखा विभागाचे कर्मचारी ईंगोले आदी कर्मचारी उपस्थित होते.
कार्यालयाच्या परिसरात उलट सुलट चर्चेला उधाण
दरम्यान पंचायत समितीचे कार्यालयाच्या लेखा विभागाला आग लागल्याने संगणकासह इतर महत्त्वाचे दस्तावेत जळाल्यामुळे कार्यालयाच्या परिसरात उलट सुलट चर्चेला उधाण आल्याचे दिसून आले. दरम्यान औंढा पंचायत समिती लेखा विभागाला आग लागल्याने पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांनी भेट देऊन पाहणी करून कसून चौकशी चालू असून कार्यालयाला शॉर्ट सर्किटमुळे लागली का कोणता मास्टर म्हणून यामध्ये आहे हे चौकशीतून आता सिद्ध होणार आहे.