रिसोड (Washim):- रिसोड तालुक्यातील बोरखेडी येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्याला आग (Fire) लागून तब्बल 5 लाख 85 हजार रुपयाचे नुकसान झाल्याची घटना दिनांक 18 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वा दरम्यान घडली. आगीमध्ये 2 गाई 1 बैल व 1 वासरू जळून मृत पावले.
आगीमध्ये 2 गाई 1 बैल व 1 वासरू जळून मृत पावले
आगी मध्ये झालेल्या नुकसानीनंतर शेतकरी वर खूप मोठे संकट येऊन पडलेले आहे. घटनास्थळाचा पंचनामा शिवकन्या कोतीवार तलाठी बोरखेडी यांनी करून अहवाल महसूल विभागाला पाठवला आहे. याबाबत माहिती अशी की रिसोड तालुक्यातील बोरखेडी येथील शेतकरी भीमराव शंकर जायभाये यांचा गावापासून दाभा रोडवर एक किलोमीटर अंतरावर शेतात गोठा आहे. या गोठ्याला पहाटे तीनच्या दरम्यान अचानक आग लागली सदर घटनेची माहिती शेतकरी भीमराव जायाभये यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले मात्र तोपर्यंत सर्व जळून खाक झाले होते. या घटनेमध्ये त्यांचे एक बैल किंमत 80 हजार रुपये, दोन गाय किंमत दीड लाख रुपये, ऐक वासरू किंमत 30 हजार रुपये, स्प्रिंकलर पाईप, स्प्रिंकलर तोट्या, टिनपत्रे, पेरणी यंत्र, केबल व इतर शेती अवजारे ठिंबक सेट असा एकूण 5 लाख 85 हजार रुपयांचा नुकसान झाला आहे. सदर घटनेनंतर गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यावर कोसळलेल्या संकटा पायी शासनाने भरपूर भरघोस मदत शेतकऱ्याला करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. आगीचे कारण अद्याप मात्र कळू शकले नाही. या आगीमध्ये एक वासरू गंभीररित्या भाजलेला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.