नांदेड (Nanded crime) : नांदेड शहरातील अष्टविनायक नगरात आज मंगळवारी भरदिवसा एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर गोळीबार (firing) करून त्यांच्याकडील नगदी 40 हजार रुपये व लंपास केल्याची घटना घडली.
अष्टविनायक नगरातील सेवानिवृत्त अधिकारी रवींद्र जोशी वय 68 वर्ष यांनी बँकेतून रक्कम काढून ते घराकडे जात होते. यावेळी अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून जोशी हे त्यांच्या घरासमोर येताच त्यांच्यावर (firing) गोळीबार केला,या (Nanded crime) घटनेत त्यांचा हातात गोळी घुसल्याने जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.