नागपूर (Nagpur):- ॲलोपॅथी (allopathy) उपचाराइतकेच आयुर्वेदिकसह इतरही पंथीच्या उपचारावर विश्वास ठेवणाऱ्या रुग्णाची संख्या वाढते आहे. आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी (Homeopathy) तसेच योगा व निर्सगोपचार आणि वृद्धापकाळातील उपचार एकाच ठिकाणी मिळण्यासाठी राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत ५० खाटांचे पहिले जिल्हा आयुष रुग्णालय नागपूरच्या मानकापूरस्थित क्रीडा संकुलासमोर (sports complex) उभारले जात आहे.
एकाच ठिकाणी आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योगा, नॅचरोपॅथी उपचार
२०२६ पर्यंत हे रुग्णालय रुग्णसेवेत सुरु होणार आहे. भारती जीवनपद्धतीत आयुर्वेदिक उपचार हे प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. आयुर्वेदिक उपचार घेण्याकडे रुग्णांचा कल वाढतो आहे. रोगाच्या मुळाशी जाऊन आजार नष्ट करण्याला आयुर्वेदात प्राधान्य असल्याने अलीकडच्या काळात एक मोठा वर्ग आयुर्वेदिक उपचार घेत आहेत. पंचकर्म करणाऱ्यांची संख्याची वाढत आहे. त्याचप्रमाणे होमिओपॅथी व इतरही पॅथीचा उपचार घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. रुग्णांची गरज ओळखून राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत महाराष्ट्रात दोन ते पाच लाख लोकसंख्येसाठी ३० व५० खाटांचे आयुष जिल्हा रुग्णालय सुरू केले जाणार आहे. नागपुरातही ५० खाटांच्या रुग्णालय बांधकामाला मागील वर्षापासून सुरुवात झाली आहे.
नागपुरातही ५० खाटांच्या रुग्णालय बांधकामाला मागील वर्षापासून सुरुवात
बांधकामाला १५ कोटींची मंजुरी रुग्णालयाच्या बांधकामाला १० जानेवारी २०२४ रोजी १५ कोटींची मंजुरी प्राप्त आहे. तळमजल्यासह एक मजल्याचे हे रुग्णालय(Hospital) असणार आहे. या रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्णसेवा (Outpatient care) तसेच आंतरविभागात रुग्णांना दाखल करून उपचार दिले जाणार आहे. रुग्णालयात ६० ते ७० पदे असतील तसेच विशेषज्ञांची ७ पदे असणार आहेत. जिल्हा आयुष रुग्णालयात आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानीसारख्या उपचारपद्धतीने रुग्णांवर उपचार होतील तसेचपंचकर्म, क्षारसूत्र आदी आयुष उपचार होणार आहेत. वृद्धापकालीन जेरियाट्रिक रुग्णोपचार उपलब्ध असणार आहे. रुग्णालयात ओपीडी, कॅज्युअल्टी, प्रोसीजर रुम, युनानी, प्रयोगशाळा, नॅचरोपॅथी योगा हॉल, अॅडमिन व कैंटीनची सोय असणार आहे.
जिल्हा आयुष रुग्णालयाची संरचना, मनुष्यबळ, साधन सामग्री, औषधी व निवासस्थाने इत्यादीचा सविस्तर कृती आराखडा बनवण्यात आला आहे. तळ अधिक एक मजली इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. पुढील वर्षात हे रुग्णालयात रुग्णसेवेत सुरु होइल. रुग्णालयातून दिल्या जाणाऱ्या आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योगा व निर्सगोपचारमधून रुग्णांना मोठा फायदा होणार आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी स्पष्ट केले.