सिं. राजातून ‘वंचित’कडून पुन्हा सविताताई मुंडे!
बुलडाणा (Buldhana Assembly Election) : वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यातील 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून, विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यात (Buldhana Assembly Election) बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघासाठी पुन्हा एकदा सविताताई मुंडे (Savita Munde) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शनिवार 21 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात, राज्यातील 11 उमेदवार अगदी जातीनिहाय जाहीर केले आहेत. त्यात रावेर: शमीभा पाटील (लेवा पाटील), सिंदखेडराजा: सविता मुंडे (वंजारी), वाशिम: मेघा किरण डोंगरे (बुद्धिस्ट), धामणगाव रेल्वे: निलेश विश्वकर्मा (लोहार), नागपूर दक्षिण/पश्चिम: विनय भांगे (बुद्धिस्ट), साकोली: डॉ. अविनाश नंन्हे (धिवर), नांदेड दक्षिण: फारुख अहमद (मुस्लिम), लोहा: शिवा नरांगडे (लिंगायत), औरंगाबाद पूर्व: विकास रावसाहेब दांडगे (मराठा), शेवगाव: किसन चव्हाण (पारधी), खानापूर: संग्राम माने (वडर).. अशा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील एक सिंदखेडराजा (Buldhana Assembly Election) विधानसभा मतदार संघातून 2014 मध्येही सविता मुंडे (Savita Munde) यांना वंचितने उमेदवारी दिली होती, त्यावेळी त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या. आता पुन्हा एकदा (Vanchit Bahujan Aghadi) वंचित बहुजन आघाडीने त्यांच्याच खांद्यावर उमेदवारीची झूल ठेवली असून, सामाजिक समीकरणात त्या तरतात की, त्याचा फायदा पुन्हा एकदा दुसऱ्या उमेदवाराला होतो ? हे मात्र येणारा काळच ठरवेल.