हलक्या दर्जाच्या गुलालाची विक्री करणे भोवले
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Gulabandi) : जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सां खर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार कारेवाड यांनी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीत रासायनिक गुलालाची उधळण करणे तसेच विक्री व साठवणुकीवर त्याच बरोबर हलक्या दर्जाच्या गुलाल विक्री (Gulabandi) करणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करून 9 हजार रुपये किमतीचा गुलाल हस्तगत केला अशी ही जिल्ह्यात पहिलीच कार्यवाही झाल्यानें मोठीं खळबळ उडाली आहे.
जिल्हयातील साखरखेर्डा पोलीस स्टेशनला नुकतेच रूजू झालेले दबंग ठाणेदार यांनी अवैध धंद्यांवर मोठी करडी नजर ठेवत कर्मचारी तैनात ठेवले आहेत. त्यांमध्ये गुपीत माहिती वरुण साफळा रचला आणि ,महसुल विभागाचे अधीकारी तसेच ग्रामविकास अधीकारी चनखोरे तसेच मंडळ अधीकारी रघुनाथ सोळंके, तलाठी लखण राजपुत, कोतवाल शुभम,अशोक खरात व वैभव सुधाकर तुपकर यांनी पंचासमक्ष आशीष किराणा स्टोअर्स,संकेत वाईनवार जवळील मलकापूर पांग्रा रोडवरील आशिष अरविंद बेदाडे यांच्या किराणा दुकानाजवळील गोडाऊन मध्ये धाड टाकली असता गोडावून मध्ये १९ बॅग प्रत्येकी ५० किलो वजनाच्या प्रती बॅगमध्ये लहान १० किलोच्या ५ बॅग असलेल्या तसेच १० किलोच्या १० बॅग मिळून आल्या. त्या बॅगवर रॉकसॉल्टं असे लिहलेले असुन सदर गुलाल हातावर घेवुन बोटास पाणी लावुन चोळुन पाहीले असता त्या (Gulabandi) गुलालामध्ये रासायणीक रंग व बारीक रांगोळी सारखी चुरी आढळुन आली.
त्यामुळे गुलाल (Gulabandi) जप्त करून साखरखेर्डा पोलीस ठाण्यात अपराध क्रं 233/2024 बी एन एस कायदा कलम 223 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे,अपर पोलीस अधीक्षक बि.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधीकारी प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन साखरखेर्डा येथील ठाणेदार सपोनि गजानन दिगांबर करेवाड, सपोनि मिलींद पारडकर नेम नियंत्रण कक्ष बुलढाणा. पो उप नि ए.डी थोपटे, शुभम वरदाडे,पोहेकॉ नितीन प्र. राजे जाधव पोहेकॉ वाजीराव खरात, चालक पोकों वाघ व चालक पो कों मेहेर पोस्टे साखरखेर्डा कांबळे,ग्राम विकास अधीकारी ज्ञानेश्वर चनखोरे, महसुल स्टॉफ मंडळ अधीकारी साखरखेर्डा रघुनाथ सोळंके तसेच तलाठी लखण राजपुत, कोतवाल शुभम अशोक खरात व वैभव शुभाकर तुपकर यांनी केली.