हिंगोली (Hingoli railway station) : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात विद्युतीकरणाचे काम शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे. ३ जानेवारी रोजी १.४० वाजता नांदेड ते जम्मुतावी सुपरफास्ट हमसफर एक्स्प्रेसचे थाटात आगमन झाले. यावेळी नागरिक व प्रवाशांनी विजेवर पहिल्यांदा धावणाऱ्या या रेल्वे गाडीचे जल्लोषात स्वागत करून चालकांचा सत्कार करण्यात आला.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात विद्युतीकरणाचे काम शंभर टक्के काम पूर्ण झाले असून या निमित्ताने १२ जून रोजी मुंबई हिंगोली, मुंबई-दैनिक शताब्दी एक्स्फेस विद्युत इंजिनद्वारे चालविण्यात येत आहे. पुर्णा हिंगोली-पुर्णा या मार्गावर विद्युत इंजिनद्वारे मालगाड्या सुध्दा धावत आहेत. १३ नोव्हेंबर रोजी तेलगंना राज्यातील किरकोळ दुर्घटनेमुळे अकोला-पुर्णा-अकोला मार्गावरून विद्युत इजिनद्वारे नवी दिल्ली, चैनई, लखनऊ, अहमदाबाद, यशवंतपुर आदी ठिकाणी एक दिवसासाठी रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत.
तसेच ३० डिसेंबर २०२४ पासुन अकोला-पुर्णा अकोला मार्गाने अनेक साप्ताहिक व द्विसाप्ताहिक (Hingoli railway station) रेल्वे गाड्या विजेच्या इंजिनवर क्रमवार कायमची चालविण्यात येत आहे. दरम्यान शुक्रवारी ३ जानेवारी रोजी दुपारी १.४० वाजता नांदेड ते जम्मुतावी सुपरफास्ट हमसफर एक्स्प्रेसचे थाटात आगमन झाले. यावेळी नागरिक व प्रवाशांनी विजेवर पहिल्यांदा धावणाऱ्या या रेल्वे गाडीचे लोकोपायलट विजयकुमारसिंग यांचा, बादल चव्हाण व विठ्ठल धाडवे, पुष्पा राणे यांचा सत्कार केला.
यावेळी (Hingoli railway station) रेल्वे स्थानकावर स्टेशन मास्तर राजकुमार पाईन्टसमन, ज्ञानबा जमदाडे, गणेश शाहु, लिलाधर नन्हाने, रवि थोरात, नरेश खराटे, चंद्रकांत लोखंडे, सुनिल शाहू, राजकुमार कन्हाळे, सुनिल बोचरे, त्रिवेणी इंगळे, दामोदर इंगळे, सलमा शेख, दिपक गवई, शेख जानी आदींची उपस्थिती होती. दरम्यान हिंगोली येथून हमसफर एक्स्फेस वाशिम मार्ग जम्मुतावीकडे रवाना झाली. या रेल्वेद्वारे अनेक भाविक व प्रवांशी वैष्णवीदेवीच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत. तसेच हमसफर एक्सप्रेस हिंगोली ते जम्मुतावीपर्यंत २ हजार किमी अंतरासाठी स्लीपर कोचद्वारे ९०० रुपये प्रवास भाडे आकारण्यात येत असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली. नांदेड ते जम्मुतावी एक्स्प्रेसला प्रतिदिन सोडुन वैष्णवीदेवी, कटरापर्यत वाढविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश साहू यांनी केली आहे.