Pandharkawda :- तालुक्यात जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) अनेक शाळांच्या ईमारती जिर्ण झालेल्या आहे. या जिर्ण झालेल्या वर्ग खोल्यामध्ये विद्यार्थ्यांचा वर्ग भरत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेवर प्रश्न निर्माण झाले आहे. वर्गखोलीतील सिलींग फॅन चक्क पहिल्या वर्गातील विद्यार्थ्याच्या डोक्यावर पडल्याची घटना केळापुर तालुक्यातील मोहदा येथील वाडी पोड जिल्हा परिषद शाळेत घडली.
पहिल्या वर्गातील विद्यार्थ्याच्या डोक्यावर पडला चक्क सिलींग फॅन
फॅन सदर घटनेत विद्यार्थ्यांच्या डोक्याला गंभीर ईजा झाली असुन त्याला यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. भाविक झांबरे असे सिलींग फॅन (Ceiling fan) पडल्याने जख्मी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तालुक्यातील मोहदा येथील वाडी पोड येथे जिल्हा परिषदेची वर्ग १ ते ५ ची शाळा आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी पटसंख्या १५० ते २०० च्या घरात आहे. शाळेची ईमारत सुध्दा जुणी असुन मागिल वर्षी शाळेला रंगरंगोटी करण्यात आली होती. ५ रोजी नेहमी प्रमाणे शाळा सुरु असतांना दुपारी ४ वाजताच्या सुमारास पहिल्या वर्गाच्या वर्गखोलीतील सिलिंग फॅन अचानकपणे वर्गात अभ्यास करीत असलेल्या भाविकच्या डोक्यावर पडला. फॅन पडताच भाविकसह वर्गातील ईतर विद्यार्थ्यांनी सुध्दा आरडा, ओरड केली होती. भाविकच्या डोक्यातुन रक्तस्त्राव होवु लागल्याने त्याला शिक्षकांनी सर्वप्रथम मेटीखेडा येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रात (health center) व तेथुन यवतमाळला हलविले होते.
या घटनेने जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे. तालुक्यातील अनेक जि प शाळेच्या वर्ग खोल्या ह्या जिर्ण झालेल्या आहे. जिर्ण वर्ग खोल्यांमुळे विद्यार्थ्यांचा जिव धोक्यात आला आहे.