हिंगोली (Narahari Jirwal) : जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री नरहरी यांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी जिल्हा नियोजन ची आढावा बैठक घेतली जाणार होती परंतु ते उशिराने आल्याने पहिलीच बैठक बारगळी. राज्यामध्ये महायुतीचे शासन सत्तारूढ झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी (Narahari Jirwal) यांची पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली.
नियुक्तीनंतर 26 जानेवारीच्या ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त पहिल्यांदाच ते येणार होते. 25 जानेवारी रोजी त्यांचे हिंगोलीत आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेच्या कामाचा आढावा घेणार होते त्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व विभागामधील अधिकाऱ्यांना बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.
या बैठक करता सर्व अधिकारी विविध बाबीची माहिती घेऊन सभागृहात उपस्थित झाले होते. परंतु पालकमंत्री नरहरी झिरवाळ (Narahari Jirwal) हे रात्री सातच्या सुमारास जिल्ह्यात दाखल झाले. ते उशिराने आल्याने जिल्हा वार्षिक योजनेच्या कामाची आढावा बैठक बारगळली. त्यानंतर पालकमंत्री हे वसमत येथे सत्कार कार्यक्रमाला रवाना झाले होते. हिंगोलीत त्यांच्या उपस्थितीत होणारी पहिलीच बैठक पहिल्याच दौऱ्यात बारगळ्याने भविष्यात असाच पायंडा पडतो की काय असा सूरही नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.