जिल्हयातील पहिला मरणोत्तर नेत्रदान उपक्रम
गडचिरोली (Eye Donation) : राष्ट्रीय अंधत्व नियंत्रन कार्यक्रम सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे मानवी अवयव प्रत्यारोपन कायदा १९९४ अंतर्गत नोंदणी करून गतवर्षापासून नेत्रसंकन केंद्र (Eye Donation) सुरु झाले आहे. कुनघाडा रै. येथील मालूबाई शामराव वासेकर या आंतर रुग्ण रुग्ण विभागातील आयसियु येथे उपचार घेत असतांना त्यांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. आईचे दुःख पचवून मुलगा शशिकांत शामराव वासेकर आणि त्यांचे नातेवाईक यांनी दत्तगुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान यांच्या प्रेरणेतून आईचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी फिलनाके व अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतिशकुमार सोलंके यांच्या मार्गदर्शनात (Eye Donation) नेत्र संकलन चमुशी संपर्क करुन वैद्यकीय अधिकारी डॉ. देशक सहारे , नेत्र चिकित्सा अधिकारी राजेश बत्तुलवार, राकेश चांदेकर व अधिपरिचारीका रोशनी पाटील यांनी नेत्रदाता मालुबाई शामराव वासेकर यांची मरणोत्तर नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली.
दोन अंधांना नेत्रज्योत देण्याचा निर्णय घेऊन शशिकांत वासेकर व त्यांचे नातेवाईक त्यांचे इच्छेनुसार नेत्रदान करून त्यांनी त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरविले आहे. आईच्या मृत्यु पश्चातही त्यांचे डोळे हे जग पाहत राहील अशी प्रतिक्रिया शशिंकात वासेकर व नातेवाईकांनी (Eye Donation) नेत्रदानाच्या वेळी व्यक्त केली. या वेळी वासेकर कुंटुवीयासोबत दत्तगुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानचे कार्यकर्ते जिल्हा निरिक्षक विजय गडपायले, जिल्हा अध्यक्ष प्रकाश कुनघाडकर, जिल्हा युवा अध्यक्ष किशोर चिमुरकर, ब्लड इननिड प्रमुख कार्तिक वासेकर, सुरेश चिचघरे, पितांवर कुकुडकर, प्रिती चिचघरे उपस्थित होते.