आखाडा बाळापूर (kidnapping case) : येथील व्यवसायीकाचे अपहरण करुन एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पोलीस पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून अटक करून अपहरण झालेल्या व्यक्तीची 24 तासात सुखरूप सुटका केली होती सदर प्रकरणातील आरोपींना न्यायालयासमोर हजर केले आसता त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी पोलिसांनी मागीतली होती पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आसल्याच पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, शिवाजी पवार यांनी सांगितले.
कळमनुरी तालुक्यातील आडा येथील गणपत अप्पाराव शिंदे यांचे आखाडा बाळापूर येथे मुख्य रस्त्यावर शेतीउपयोगी साहित्य तयार करण्याचे दुकान पंचवीस तिस वर्षापासून आहे. गुरुवारी ते नेहमीप्रमाणे कामे आटोपून दुचाकीने बाळापूर येथून आड्याला जात असताना महामार्गावर कांडली फाटा पुलाच्या बाजूला सर्व्हिसरोडच्या बाजुला नालीवर त्यांची दुचाकी अपघात झाल्यासारखी पडली होती पण ते तेथे नव्हते ही बाब मुलाला समजली अपघात झाला समजून दवाखाने बघीतले पण ते आढळून आले नाही नंतर रात्री त्यांच्या मोबाईल वरून वाटसफ कॉल आला मुलाला तुझ्या वडिलांचे अपहरण करण्यात आले त्यांना सोडवण्यासाठी एक कोटी रूपयाची खंडणी मागण्यात आली.
सदर प्रकरणी शुक्रवारी पहाटे अविनाश गणपत शिंदे फिर्यादीवरून अज्ञात आरोपींतानी काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून वडिलांचे अपहरण करून कुठेतरी नेउन ठेवून वडिलांच्या मोबाईलवरून एक कोटी रुपयाची खंडणी मागीतली खंडणी दिली नाही तर वडिलांना खतम करून टाकतो अशी जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान सदर खळबळजनक प्रकारानंतर जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस प्रमुख अर्चना पाटील, पोलीस उपाधीक्षक दळवी, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विकास पाटील,सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, राजेश मल्लपिलू,विक्रम विठोबाने,आगलावे, आखाडा बाळापूर पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, सपोनी डी.बी.बसवंते व पोलीस पथकाने तपास चक्र फिरवली सात विविध पथके तपासाकरता नेमण्यात आली होती.
जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या घटनेची सर्व सुत्रे आपल्या हातात घेऊन त्यानुसार जमवलेल्या माहितीची अचूक विश्लेषण व गोपीनाथ माहिती काढून तसेच तांत्रिक अभ्यास करून गुन्ह्यातील पिडीत व्यक्ती गणपत शिंदे यांची माहिती जमा केली त्याप्रमाणे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी निष्पन्न करून सदर पिडीत व्यक्ती व अपहरण करणारे आरोपी यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अष्टीमंडी भागातून स्थानिक पोलीसांच्या मदतीने शिताफीने ताब्यात घेतले होते.
पोलीस पथकाने सुरजसिंग उर्फ सुरेंद्रसिंग गाडीवाले वय 24वर्षे रा.नंदीग्राम सोसायटी नांदेड, राधेशाम पंजाबराव भालेराव वय 24 रा.महाराणा प्रताप चौक नांदेड, शेख तौसीफ शेख समीर वय 32 वर्षे बारी कॉलनी छत्रपती संभाजीनगर, मुदसर हुसेन एकबाल हुसेन वय 24 खलवट चारमिणार हेद्राबाद तेलंगणा, सईद शाकेर अली सईद नासेर अली वय 28 कासमबारी दर्गा बडेगाव छत्रपती संभाजीनगर, शेख समीर शेख शफी 32 आसेफीय कॉलणी टाऊन हॉल संभाजीनगर ताब्यात घेतलेल्या आरोपींना शनिवारी उशिरा न्यायालयात बाळापूर पोलिसांनी हजर केले आसता आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे मार्गदर्शनात सदर गंभीर प्रकरणाचा तपास सुरु असुन पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली 2 गावठी पिस्टल व 1 जिवंत काडतुस,गुन्ह्यात वापरलेले 9 मोबाईल आसा 15 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आहे पोलीस कोठडी दरम्यान गुन्ह्यात वापरलेले वाहन व इतर साहित्य जप्त करायचे असल्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, सायबर सेल सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांनी आज सकाळी सांगितले.
परप्रांतातील पोलीस बाळापूरात
सदर प्रकरणात अटक आरोपी मागावर कर्नाटक पोलीस,नांदेड पोलीस पथक आले होते. आरोपी हिंगोली जिल्हा पोलीस पथकाने अटक केले असल्याचे समजल्यावर कर्नाटक पोलीस रात्री बाळापूर पोलीस स्थानकात आले होते अस सुत्रांनी सांगितले. दरम्यान पोलीस कोठडी दरम्यान गुन्ह्यातील इतर आरोपी सहभाग आणखी किती गुन्हे आरोपींनी केले याचा तपास पोलिस पथक करणार आहे.