परभणी(Parbhani) :- तुम्हाला दुकान चालवायची असेल तर आम्हाला प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, असे म्हणत पैशांची मागणी करण्यात आली. दुकानाच्या शटरवर दगड मारत दोन हजाराचे नुकसान करण्यात आले. ही घटना परभणी शहरातील सुपर मार्केट भागात २१ जानेवारी रोजी दुपारी दिड वाजता घडली. सदर प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
सुपर मार्केट भागातील घटना तिघांवर गुन्हा दाखल
प्रताप मेहत्रे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीचे भगवती कृपा अॅटो मोटीव्ह नावाचे दुकान आहे. आरोपींनी संगणमत करत फिर्यादीला तुम्हाला दुकान चालवायचे असेल तर आम्हाला प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल असे म्हणत पैशांची मागणी केली. तक्रारदाराने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी संगणमत करत अश्लिल भाषेत शिवीगाळ (Abusing) करुन दुकानावर दगडफेक करत दोन हजाराचे नुकसान केले. तसेच तुम्ही आमच्या विरुध्द पोलिसात तक्रार दिली तर तुमच्यावर अॅट्रोसिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल करुन जेलमध्ये घालतो, अशी धमकी दिली.
हातपाय तोडून टाकू, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सोनु भतडे, रणजीत लहाणे व इतर एका अनोळखीवर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोह. वाकळे करत आहेत.