चंद्रपूर (Sindewahi Crime) : सिंदेवाही पोलिस ठाण्याच्या हद्दीत डीजे चे साहीत्य चोरी गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून या प्रकरणातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या (Sindewahi Crime) गुन्ह्यातील आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथक आणि पोलीस स्टेशन सिंदेवाही येथील पथक यांनी संयुक्तरित्या केला. या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींमध्ये शुभम नागोसे (२८) रा. सिंदेवाही व इतर ४ यांना पो.स्टे. सिंदेवाही परिसरातून ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन नागपूर व सिंदेवाही येथील गुन्हयात चोरीस गेलेला संपुर्ण मुद्देमाल तसेच गुन्हयात वापरलेले वाहने जप्त करण्यात आले आहे.
गुन्हयाचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहे. (Sindewahi Crime) सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पोस्टे सिंदेवाही चे ठाणेदार पोलीस निरीक्षक विजय राठोड यांचे संयुक्त नेतृत्वात पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सागर महल्ले, पोउपनि प्रेमनाथ ठवकर, पोहवा जयंत चुनारकर, नितेश महात्मे, पो. अं. गणेश भोयर, प्रदीप मडावी व चालक पोहवा दिनेश अराडे यांनी केली .