११०० घर व गोठे क्षतिग्रस्त
गोंदिया (Natural Disaster) : ९ व १० सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घतले. दरम्यान सर्वत्र पाणीच पाणी अशी (Natural Disaster) परिस्थिती निर्माण झाली. अनेक घरात पाणी शिरले. नदी-नाले ओसंडून वाहू लागले. या नैसर्गिक आपत्तीमुळे गोंदिया जिल्ह्याला जिवीतहानीसह वित्तहानीला समोर जावे लागले. गेल्या तीन दिवसात पुर परिस्थितीमुळे ५ जणांना मृत्यू झाला. ४८ जनावरे दगावली. त्याचबरोबर जवळपास ११०० घर व गोठे क्षतिग्रस्त झाले. उल्लेखनिय असे की, ३००० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यूमुखी पडल्या.
जिल्ह्याला ९ व १० सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाने धुवून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. नदी, नाले ओसंडून वाहू लागले. अनेक वसाहती पाण्याखाली सापडल्या. तर अनेक घरांना पाण्याने वेढा घातला. यामुळे घर व गोठ्यांची पडझड सुरू झाली. तर पिकांचे अतोनात नुकसान झाले. एवढेच नव्हेतर पुरात अनेक कुटूंब अडकले. दरम्यान त्यांना सुरक्षित स्थानी हलविण्यात आले. तर काही घटनांमध्ये पाच जणांना जीव गमवावा लागला. त्याचबरोबर (Natural Disaster) पुर परिस्थितीमुळे सहा मोठे जनावरे, ४२ लहान अस एकूण ४८ जनावरे दगावले. तसेच ३ हजाराहून अधिक कोंबड्या मृत्यूमुखी पडल्याची जिल्हा प्रशासनाकडे नोंद आहे.
३० कुटूंब आले उघड्यावर
सतत दोन दिवस मुसळधार पाऊस (Natural Disaster) पडल्याने जिल्हृयात घरांची पडझड सुरू झाली. १६१७ घरे अंशत पडली तर ३० घरे पूर्णत जमिनदोस्त झाले आहेत. यामुळे त्या ३० कुटूंबाना उघड्यावर संसार थाटणे भाग पडले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून त्या कुटूंबाची तात्पुरती व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे. त्याचबरोबर ४४९ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.
धापेवाडा येथे युवक पुरात वाहून गेला
दोन दिवसापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसाने धरण, तलावांच्या जलसाठ्यात मोठ्याने वाढ झाली आहे. परिणामी पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे नदी-नाल्यांचा पुर आला आहे. पावसाने विश्रांती घेतली असली तरी गोंदिया व तिरोडा तालुक्यातून वाहत असलेली नदी-नाले दुथडी वाहत आहेत. आज (ता.१२) सकाळी धापेवाडा येथील एका युवक जनावरे घेवून चारण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याचा नाल्यात तोल गेल्याने तो पुरात वाहून गेला. या (Natural Disaster) घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळ गाठून पुरात वाहून गेलेल्या युवकाचे मृतदेह शोधून काढले. प्रदिप बाबुलाल तुरकर (३८) रा.नवेगाव असे मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे.